स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप अर्थात अभिनेता मंदार जाधवने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या तो सगळ्यांचाच फेव्हरिट झाला आहे. त्याच्या कामाचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधव याने नुकतेच मर्सिडीज बेंझ गाडी विकत घेतली आहे. त्याने ही गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर चाहते कमेंट्सचा वर्षान करत आहे.
अभिनेता मंदार जाधवने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर मर्सिडीज बेंझ या कारचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याची फॅमिलीदेखील दिसते आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. जी मर्सिडीझ कार घेतली आहे तिची बेसिक किंमत जवळपास ४० लाख रुपये असून ऑन रोड प्राईज ही ४७ लाखांच्या जवळपास असल्याचे बोलले जात आहे.
हिंदी मालिकांनंतर तो मराठी सिनेइंडस्ट्रीकडे वळला. श्री गुरुदेव दत्त या मालिकेत दत्तात्रयाची मुख्य भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. मात्र काही कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.