Join us  

मुलगा की मुलगी? सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 11:58 AM

सेलिब्रिटी जोडप्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री राजश्री रानी व अभिनेता गौरव मुकेश यांनी चाहत्यांना गुड न्युज दिलीय. राजश्री आणि गौरव या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. राजश्रीने तिच्या सर्व फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केलीय. त्यांच्यावर चाहते आणि सेलिब्रिटी मित्र-मैत्रीणी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

राजश्री राणीने 1 फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला आहे. द टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'आमच्या बाळाचा जन्म फेब्रुवारीमध्येच व्हावा, अशी गौरवची इच्छा होती, कारण हा प्रेमाचा महिना आहे आणि त्याची इच्छा पूर्ण झाली आहे'. तर  गौरव म्हणाला, 'पहिल्यांदा बाळाला आपल्या मांडीवर घेतलं. तो क्षण मी शब्दात सांगू शकत नाही. तो खूप भावनिक क्षण होता. वडील बनल्यानंतर जबाबदार झाल्याची जाणीव होत आहे'. 

राजश्री रानी व गौरव मुकेश यांनी अद्याप आपल्या बाळाचे नाव ठेवलेले नाही. राजश्री म्हणाली, 'एकत्र कुटुंबात सर्वांच्या संमतीने निर्णय घेतले जातात. आम्ही कोणतेही नाव ठरवलेले नाही. कारण आमच्याकडे जन्म दाखल्यासाठी नोंदणी करण्यासाठी अजून 1 महिना बाकी आहे'.  राजश्री आणि गौरवचे लग्न हे 2020 ला झाले होते.राजश्री राणीबद्दल सांगायचे तर 'सुहानी से एक लड़की' या मालिकेमधून ओळख मिळाली. तिनं इमली, सीआयडी यांसारख्या शोमध्ये काम केले आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटीसामाजिक