Join us

राघव जुयालासोबत सुगंधा मिश्रा करणार Dance+4 चे सूत्रसंचालन, असा असणार तिचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 06:00 IST

हिंदीमधील विविध शोमध्ये बिझी असणारी  सुगंधा मिश्रा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. कायमच ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.

हिंदीमधील विविध शोमध्ये बिझी असणारी  सुगंधा मिश्रा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. कायमच ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. नुकताच तिने शेअर केलेला फोटो सध्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत ती सुंदर दिसत असून तिचा देसी लूक फॅन्सना भावतो आहे.आता लवकरच 'डान्स+ ४'  या रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन करताना झळकणार आहे. ‘सपनें सिर्फ अपनें नहीं होते’ ह्या विचारावर हा सीझन आधारित आहे. 

नेहमीप्रमाणे डान्स च्या मंचावर सुपर जज रेमो डिसुझासोबत 'डान्स+ ४' चे तीन लोकप्रिय कॅप्टन्स अतिशय उत्तम डान्सर्स आणि कोरियोग्राफर्स शक्ती मोहन, धर्मेश येलांडे आणि पुनित पाठक हे असतील, तर सुंगधा मिश्रासह सगळ्‌यांचा लाडका राघव जुयालही सूत्रसंचालन करणार आहे. 

याविषयी सुंगधाने सांगितले की,“डान्स+ ४ मध्ये सहसूत्रसंचालक म्हणून काम करण्यासाठी मी खूपच उत्साहात आहे, मी ह्या शो ची मोठी चाहती आहे. यात मी केवळ सूत्रसंचालक नसणार आहे तर 'भाभी' ह्या खास अवतारात दिसणार आहे. ती अतिशय मजेदार असून ह्या शोमध्ये खूप मस्ती आणि अगदी मॅडपणा करेल. यासोबत रंगीबेरंगी साड्‌या, लांब वेणी, मोठे कानातले असा माझा खास लूक असेल. भाभी तिच्या लूकपासून तिची देहबोली, तिचा आवाज आणि तिची स्टाईल असा सगळ्‌यांमध्ये अगदी खास असेल. ह्या व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे आहेत त्यामुळे ती साकारणे आव्हानात्मक आहे. आपल्या विनोदबुद्धी आणि वागण्याने ती प्रेक्षकांची हसूनहसून  लोटपोट  करेल. 

यासाठी राघवसोबत काम करण्याबद्दल मी खुश आहे कारण त्याचे कॉमिक टायमिंगही अफलातून आहे आणि तो सगळ्‌यांसाठीच एक प्रेरणा आहे. चित्रीकरणाच्या वेळेसही तो खूप सांभाळून घेतो. त्याचा प्रेक्षकांसोबतही उत्तम कनेक्ट आहे. मला खात्री आहे आणि आम्ही दोघे हा सगळा वेडेपणा आणि तूफान धम्माल एका वेगळ्‌या उंचीवर नेऊ.”राघव आणि सुगंधा ह्या सीझनमध्ये आपल्या विनोदी मनोरंजनाने प्रेक्षकांची मस्त करमणूक करतील यात शंकाच नाही.

टॅग्स :रेमो डिसुझा