Join us

‘दिल ही तो है’ मालिकेत सुदीपा सिंग साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 12:55 IST

‘दिल ही तो है ही एक आगळी वेगळी प्रेम कथा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच प्रसारित होणार आहे. ही मालिका ...

‘दिल ही तो है ही एक आगळी वेगळी प्रेम कथा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच प्रसारित होणार आहे. ही मालिका बालाजी टेलिफ्लिम्सची असून एकता कपूर स्वतः कलाकारांच्या निवडीकडे बारीक लक्ष ठेवून आहे. टीव्ही उद्योगात पदार्पण करत असलेला ओंकार कपूर आणि नवोदित योगिता बिहाणी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. ओंकार मासूम या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाला होता तर योगिताने आजवर अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. नुकतीच ती सलमान खानसोबत दस का दम या मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकली होती. यांच्याशिवाय फरीदा दादी, गितांजली टिकेकर यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांची निवड या मालिकेसाठी करण्यात आली आहे. आता मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी सुदीपा सिंगची निवड करण्यात आली आहे. ती या मालिकेत अक्षय डोगराची पत्नी साची नूनच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची व्यक्तिरेखा सकारात्मक असून ती एक आनंदी, कुटुंबवत्सल स्त्री आहे. यापूर्वी सुदीपाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे आणि टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांसाठी तो एक परिचित चेहरा आहे.सुदीपा एक अष्टपैलू कलाकार आहे आणि ती नेहमी अधिक चांगल्या संधींच्या शोधात असते. नवीन मालिकेतील तिच्या सहभागाबद्दल सुदीपा सांगते, “बालाजीसोबत काम करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते आणि एकता कपूरला तुमच्यातील उत्तम अभिनय काढून घेण्याची कला चांगलीच अवगत आहे. मला एकता कपूरसोबत काम करण्याची इच्छा पहिल्यापासूनच होती. अखेरीस देवाने माझी प्रार्थना ऐकली. यापूर्वी मी अनेक मालिकांमधून काम केलेले आहे. पण मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका अगदी वेगळी आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याबद्दल बरीच चर्चा होत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे हे मालिकेच्या निर्मात्यांसाठी आणि कलाकारांसाठी अधिकच आवश्यक झालेले आहे. या मालिकेवर काम सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”करण जोहरने दिग्दर्शित केलेला कभी खुशी कभी गम प्रेक्षकांना आता मालिकेच्या रूपात पाहायला मिळणार आहे. दिल ही तो है असे या मालिकेचे नाव असून  छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार या मालिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : ‘दिल ही तो है’ मध्ये फरीदा दादी साकारणार कभी खुशी कभी गम या चित्रपटातील या पात्राशी सार्धम्य असलेली व्यक्तिरेखा