Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चीकू की मम्मी दूर की' मालिकेत दिसणार सुधा चंद्रन?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:45 IST

'चीकू की मम्मी दूर की'चा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

'चीकू की मम्मी दूर की' या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहत होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोने मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

मालिकेचे निर्माते प्रेक्षकांना आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्याच्या तयारीत असून कदाचित आणखी एक दिग्गज कलाकार मालिकेत एंट्री घेताना दिसणार आहे. ताज्या बातमीनुसार निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रनला आणण्याची योजना बनवत आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री सुधा चंद्रन या मालिकेत एक केमिओ करताना पाहता येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, "सुधा चंद्रन टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे ज्या आपल्या असाधारण अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जातात.

या मालिकेत नृत्याचे सुंदर एलिमेंट असून सुधाजींचा नृत्याशी सरळ संबंध असल्याने, त्या निश्चितपणे यातील  केमिओसाठी एक आदर्श विकल्प असतील. या बाबतत चर्चा सुरू असून दोन डांसिंग स्टार चीकू आणि सुधा जी एकत्र येतील, तेव्हा तो शानदार नजारा पाहणे अधिक मनोरंजक असेल."

टॅग्स :सुधा चंद्रन