Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुदर्शनी आणि श्रीदेव खेळले १ करोडचा प्रश्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 15:38 IST

कलर्स मराठीवरील कोण होईल मराठी करोडपती म्हणजे महाराष्ट्राचा महामंच जिथे होतो प्रत्येकाच्या सुखाचा शुभारंभ. महाराष्ट्रातील अनेक लोकांचा स्वप्नपूर्ती करणारा ...

कलर्स मराठीवरील कोण होईल मराठी करोडपती म्हणजे महाराष्ट्राचा महामंच जिथे होतो प्रत्येकाच्या सुखाचा शुभारंभ. महाराष्ट्रातील अनेक लोकांचा स्वप्नपूर्ती करणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. आता या कार्यक्रमात एक करोड कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. मात्र आता प्रेक्षकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही असे वाटत आहे. कारण येत्या आठवड्यात तळेगाव येथे स्थायिक असलेले बहिण - भाऊ सुदर्शनी आणि श्रीदेव कोण होईल मराठी करोडपतीच्या मंचावर आले आणि त्यांनी हा अद्वितीय खेळ खेळण्यास सुरुवात केली. उत्तम तयारी करून आलेले आणि पहिल्या प्रश्नापासून उत्तम खेळणाºया या बहिण भावांनी खेळला १ करोडचा प्रश्न. हे दोघ बहिण भाऊ हि धनराशी जिंकू शकतील का? काय होईल पुढे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १२ ते १४ डिसेंबर पर्यत वाट पाहावी लागणार आहे. आपल्या अनेक स्वप्नांची पूर्ती करण्याची इच्छा घेऊन हे बहिण भाऊ कोण होईल मराठी करोडपतीच्या महामंचावर आले आहेत. सुदर्शनी एमबीए असून तिला असिस्टंट जनरल मॅनेजर(बँक) हि पदवी मिळवण्याच स्वप्न आहे, त्यासाठी ती परिक्षेची तयारी देखील करत आहे. जर तिला भूतकाळात जाण्याची संधी मिळाली तर तिच्या भावासोबत झालेली दु:खद घटना बदलण्याची तिची इच्छा आहे. भाऊ बहिणीच नातं हे खूप वेगळ आणि प्रत्येक बहिणीसाठी खूप खास असत. सुदर्शनी श्रीदेवबद्दल देखील काहीस असच आहे. कारण, जर ती तीन करोड इतकी विशाल रक्कम जिंकली तर श्रीदेवच्या उपचारासाठी जो काही खर्च येणार आहे त्याच्यासाठी हि रक्कम ती वापरणार आहे तसेच आपल्या आई वडिलांसाठी गाडी घेण्याची इच्छादेखील तिने व्यक्त केली.