Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अशी माणसं आपल्यापासून दूर झाली ना, की...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 11:13 IST

Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके बऱ्याचदा आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल लिहित असतो. आता त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक नाटक, चित्रपटांमध्ये काम करून रसिकांच्या मनात घर केले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कुशल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)मधून प्रेक्षकांना खळखळून हसवतो आहे. त्याला खऱ्या अर्थाने या शोमधून लोकप्रियता मिळाली आहे. अभिनयाची उत्तम जाण आणि अफलातून विनोद बुद्धीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या कुशल बद्रिकेचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान आता त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.

कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत लिहिले की, कधी कधी अगदी सर्वसाधारण वाटणारी माणसं हळूहळू रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा जवळची, एकदम खास होऊन बसतात. त्यांच्यासोबतचं आपलं नेमकं नातं काय ? तर नेमकं असं काही सांगता येत नाही, पण मग बऱ्याचदा आपण त्यांना “मित्रच” म्हणतो.

त्याने पुढे या पोस्टमध्ये लिहिले की, अशी माणसं आपल्यापासून दूर झाली ना, की आयुष्य म्हणजे समुद्रात हरवलेल्या गलबता सारखं वाटू लागतं... “दिशाहीन”... ज्याचं परतण्याचं बंदर हरवलंय असं ,पाण्यावर नुसतं हेलकांडणारं एखादं जहाज. पण एकदा शिडांमधला वारा आणि दिशांमधला तारा गवसलाना की किनारा गाठू आपणही.  किनाऱ्याला नेणारी एखादी लाट, पाण्याची वाट आपल्याही वाट्याची असेलच की !!! (सुकून)

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या