Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ऐसी दिवानगी... देखी नही कही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 16:41 IST

ऐसी दिवानगी... देखी नही कही या मालिकेत प्रेक्षकांना एक हटके लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील जोडपे हे ...

ऐसी दिवानगी... देखी नही कही या मालिकेत प्रेक्षकांना एक हटके लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील जोडपे हे खूपच वेगळे आहे. या दोघांमध्ये प्रचंड तिरस्कार आहे. पण काही गोष्टी घडतात आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. गुजरातच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा दाखवली गेली आहे. तेजस्विनी आणि प्रेम या मालिकेत नायक-नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. हे दोघेही स्वभावाने अगदी वेगळे आहेत आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील वेगळी आहे. काही परिस्थितीमुळे ते एकमेकांचा तिरस्कार करू लागतात असे आपल्याला पाहायला मिळणार आहे.धरम सिंग राठोड हे त्यांच्या भूतकाळात डॉन होते आणि त्यामुळे आपल्या भूतकाळाची गडद छाया आपल्या वर्तमानावर पडेल अशी धास्ती त्यांना कायम लागून आहे.  तेजस्विनीचे वडील एक शहीद पोलिस अधिकारी आहेत. तेजस्विनी आपल्या वडिलांसारखी अतिशय निडर आणि धैर्यशील आहे. न्याय आणि सत्यासाठी ती मागेपुढे पाहात नाही. ती लहानपणापासून तिच्या वडिलांच्या धैर्याच्या कथा ऐकून मोठी झाली आहे. ते वाईट शक्तिंशी लढताना शहीद झाले ऐवढेच तिला माहीत आहे. पण पुढे जाऊन तिला कळते की, तिच्या वडिलांचा खून खुद्द धरम सिंग राठोड यांनी भर बाजारात अमानुषपणे केला होता. हे तिला कळल्यानंतर मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी अनेक ऑडिशनमधून कलाकारांची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत दोन नवीन चेहरे प्रेक्षकांना दिसणार असून तेजस्विनीची भूमिका ज्योती शर्मा तर प्रेमची भूमिका प्रणव मिश्रा साकारणार आहे. या मालिकेत धरम सिंग या भूमिकेत रसिक दवे दिसणार आहेत.