Join us
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीमान परत येतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 19:56 IST

सा-यांचा लाडका, शत्रूचा कर्दनकाळ आणि भारतीय छोट्या पडद्यावरील पहिलावहिला सुपरहिरो... 1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ...

सा-यांचा लाडका, शत्रूचा कर्दनकाळ आणि भारतीय छोट्या पडद्यावरील पहिलावहिला सुपरहिरो... 1990 च्या दशकात छोट्या पडद्यावर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओमकारनाथ शास्त्री या फोटो पत्रकाराची एंट्री झाली.तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस. मात्र ज्यानं मनःशांती आणि ध्यानधारणा करुन सुपरपॉवर मिळवली आणि तो बनला शक्तीमान... शत्रूचा विनाश करण्यासाठी तो अवतरला. 1990 च्या दशकातल्या मुलांचा तो लाडका बनला. आता हाच शक्तीमान पुन्हा एकदा येत आहे.शक्तीमानची भूमिका साकारणा-या मुकेश खन्ना यांनी याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे खुद्द 57 वर्षीय मुकेश खन्ना ही भूमिका साकारणार आहेत. कोणतीही भूमिका साकारण्यासाठी वय महत्वाचं नसून ती भूमिका कशी साकारता हे महत्त्वाचं असतं असं मुकेश खन्ना यांनी सांगितलंय.त्यामुळं आता पुन्हा एकदा ऐकू येणार सॉरी शक्तीमान.