Join us

दिशाऐवजी नीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 12:18 IST

भौकाल या मालिकेत परम सिंग आणि विकास मनाकटला प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोचे नुकतेच चित्रीकरण दिल्लीत करण्यात ...

भौकाल या मालिकेत परम सिंग आणि विकास मनाकटला प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोचे नुकतेच चित्रीकरण दिल्लीत करण्यात आले. या मालिकेद्वारे दिशा परमार छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याची चर्चा होती. पण दिशाच्याऐवजी नीती टेलर या मालिकेचा भाग बनणार असल्याचे आता म्हटले जात आहे. दिया और बाती हम या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये नीती झळकणार होती. पण नीती या कार्यक्रमात नव्हे तर भौकालमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. मालिकेच्या संकल्पनेत काही बदल केल्यामुळे आता नीतीचा विचार केला जात आहे. नीतीला या मालिकेविषयी विचारण्यात आले असून सध्या त्यांची चर्चा सुरू असल्याचे ती सांगते.