Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता उल्टा का चष्मा' देतेय या मालिकेला जोरदार टक्कर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 17:43 IST

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं ...

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मात्र या मालिकांपैकी अगदी मोजक्या मालिका वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड घालतात. अशीच एक मालिका म्हणजे ये रिश्ता क्या कहलाता है. या मालिकेनं गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत एक नवा रेकॉर्ड रचला आहे. छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 12 जानेवरी 2009 पासून सुरु झालेली ही मालिका गेल्या 9 वर्षांपासून ही मालिका रसिकांचं अविरत मनोरंजन करत आहे. नुकतंच या मालिकेनं अडीच हजार भागपूर्ण केले आहेत. केवळ सर्वात जास्त काळ सुरु असलेली मालिकाच नाही तर या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. हा रेकॉर्ड झाल्यानं ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेची टीमसुद्धा भलतीच खुश आहे. मालिकेनं अनेक चढउउतार पाहिले असले तरी रसिकांना जे आवडतं ते दाखवून त्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्याबद्दल निर्मात्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या मालिकेच्या सुरुवातीला अक्षरा (हिना खान) आणि नैतिक (करण मेहरा) प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले. त्यानंतर मालिकेनं लीप घेतला आणि त्यावेळी हिना खान हिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्यावेळी अक्षराची लेक नायरा आणि कार्तिक मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा बनले. हिनानं मालिकेतून एक्झिट घेतली तरी त्यावेळी मालिकेच्या टीआरपीवर कोणताही परिणाम झाला नाही. ये रिश्ता क्या कहलाता या मालिकेला छोट्या पडद्यावर सध्या तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेकडून टक्कर मिळत आहे. तारक मेहता मालिकेचे 2314 भाग प्रसारित झाले आहेत. याआधी बालिका वधू आणि साथ निभाना साथिया या मालिकेनंही 2 हजार भागाचा टप्पा गाठला होता. ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत नक्ष आणि किर्तीच्या लग्नाची धामधूम सुरु असून इथं नवनवीन ट्विस्ट घडतायत. त्यामुळे आगामी काळात ये रिश्ता क्या कहलाता है मालिका नवनवीन रेकॉर्ड रचणार असंच दिसत आहे.