Television New Serial: सध्या छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या विषयांवर आधारित नव्या मालिकांटी घोषणा केली जात असल्याचं पाहायलं मिळतंय. अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर नवीन मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या नवीन मालिकांचे प्रोमो आता समोर येत आहेत. अशाच एका नव्या मालिकेचा प्रोमो व्हायरल होतोय. नात्यांवर आधारित अनोखी कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीने ‘सुना येती घरा’ या नव्याकोऱ्या मालिकेची घोषणा केली आहे. दोन कुटुंबांतील भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय.
दरम्यान, या मालिकेत शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबांची कथा दाखवण्यात येणार आहे.प्रेमविवाहामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण होतो. त्यामुळेच आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही, तर आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं असा नियम घरात एकमताने ठरवला जातो. या मालिकेमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले,"सासू, सासरे, सुना आणि मुलांना एकत्र बांधून ठेवणारी ही गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडेल. एका घरात तीन सुना आल्यावर कथेची गंमत वेगळीच होईल. परस्पर नातेसंबंधावर भाष्य करणारी ही मालिका हृदयस्पर्शी असेल ही खात्री आहे."
त्यानंतर अभिनेते अशोक शिंदे भावना व्यक्त करत म्हणाले,"स्टार प्रवाह सोबतची माझी ही नववी मालिका. पुन्हा या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माणसं जपणारा, कुटुंबवत्सल असं शिवनाथ हे पात्र मी साकारणार आहे. आपलं कुटुंब पाठीशी असेल तर जगातली कोणतीही लढाई जिंकता येते असा त्याचा ठाम विश्वास आहे. त्याची मुलं म्हणजे त्याचा अभिमान. त्यांच्यावर त्याचा जीव आहे. त्यांना चांगलं वळण मिळावं म्हणून तो कधी कठोरही वागतो, पण मनात कायम काळजी आणि प्रेम आहे. भावनिक संघर्षातून जाणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल."
अभिनेत्री दीपा परब छोट्या ब्रेकनंतर पुन्हा मालिका विश्वात कमबॅक करत आहे.
स्टार प्रवाहसोबतची अभिनेत्रीची ही पहिलीच मालिका आहे. या आगामी मालिकेत ती उमावती नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना
अभिनेत्रीने म्हटलं,"मालिकेची गोष्ट आणि पात्र ऐकताक्षणीच मला भावलं. उमावती स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे. आई आणि पत्नीची कर्तव्यं ती पूर्णपणे जाणते. वडील आणि मुलांमधला संवेदनशील पूल म्हणून ती स्वतःकडे पाहते. प्रचंड श्रीमंतीत वाढूनही तिने शिवनाथसोबत शून्यातून कष्ट करून संसार उभा केला. प्रेक्षकांनाही या मालिकेत स्वतःचं घर दिसेल याची खात्री आहे.’
शर्मिष्ठा राऊत काय म्हणाली?
शर्मिष्ठा राऊत म्हणाली,"पुन्हा एकदा खलनायिका साकारतेय. पद्मावतीचा वेगळा दरारा आहे. कपटीपणा तिचा स्थायी स्वभाव आहे. आपली श्रीमंती सगळ्यांना दिसलीच पाहिजे, हा तिचा अट्टहास असतो. बोलताना ती कुणाची पर्वा करत नाही; समोरच्याला काय वाटेल याचा विचारही करत नाही. जवळपास ३ वर्षांनंतर पुन्हा मालिका करतेय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे." असं अभिनेत्रीने मालिकेतील पात्राबद्दल बोलताना सांगितलं.
Web Summary : Star Pravah announces 'Suna Yeti Ghara,' a story of family bonds and emotional conflicts. Ashok Shinde, Deepa Parab, and Sharmishtha Raut star in this saga of love, tradition, and relationships within two families, promising a heartfelt narrative.
Web Summary : स्टार प्रवाह ने 'सुना येती घरा' की घोषणा की, जो पारिवारिक बंधन और भावनात्मक संघर्ष की कहानी है। अशोक शिंदे, दीपा परब और शर्मिष्ठा राउत दो परिवारों के भीतर प्यार, परंपरा और रिश्तों की इस गाथा में अभिनय करते हैं, जो एक मार्मिक कहानी का वादा करते हैं।