Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावर येतेय हृदयाला भिडणारी 'आनंदी', मालिकेतील घाऱ्या डोळ्यांची नवी नायिका कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:59 IST

'आनंदी' असं या मालिकेचं नाव असून याचा प्रोमो समोर आला आहे. येत्या १६ मार्चपासून ही नवी मालिका सुरू होणार आहे. 

स्टार प्रवाह नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. सामाजिक, भावनिक आणि वास्तवाशी जोडलेले विषय हाताळत स्टार प्रवाह प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करते. या वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका सुरू होणार आहे. ज्यामधून पुन्हा एकदा  हृदयाला भिडणारी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'आनंदी' असं या मालिकेचं नाव असून याचा प्रोमो समोर आला आहे. येत्या १६ मार्चपासून ही नवी मालिका सुरू होणार आहे. 

एका अपघातात दृष्टी गमावलेल्या, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची गोष्ट 'आनंदी' मालिकेत पाहायला मिळणार आहे. डोळ्यांनी जग दिसत नसलं, तरी मनाने आणि संवेदनांनी आनंदी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून तिची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतरांना सहज न सापडणाऱ्या गोष्टी आनंदी सहज ओळखते. ती अत्यंत संवेदनशील असून गरजूंना मदत करणं हा तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात, पण मन कधीच नाही हा आनंदीचा जीवनमंत्र आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेणारी आनंदी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते.

या मालिकेतून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर मालिका विश्वात पदार्पण करत आहे. आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखिका अशी तिहेरी भूमिका पार पाडलेल्या जाईसाठी ‘आनंदी’ ही भूमिका एक नवा आणि आव्हानात्मक अनुभव आहे. या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली, "आनंदी नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ही फक्त एक भूमिका नाही, तर ती एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या गोष्टी आनंदी मनाने अनुभवते आणि तिच तिची खरी ताकद आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी आम्ही एका अंध मुलांच्या संस्थेत जवळपास आठवड्याभराचं वर्कशॉप केलं. या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी खूप जवळून अनुभवता आल्या. प्रेक्षकांना आनंदी नक्कीच आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे".  

English
हिंदी सारांश
Web Title : New TV series 'Anandi' on Star Pravah: Story of a blind girl

Web Summary : Star Pravah is launching 'Anandi', a touching story of a visually impaired girl who embraces life positively. Actress Jai Khandekar debuts as Anandi, portraying her strength and sensitivity. The series starts March 16.
टॅग्स :स्टार प्रवाहटिव्ही कलाकार