Join us

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने मोडला बिग बॉसचा 'हा' रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 19:52 IST

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या चांगलाच चर्चेत आहे.

बिग बॉसचा सतरावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. दररोज या शोमध्ये नवीन ड्रामा पहायला मिळतो. अनेक लोकप्रिय चेहरे या शोमध्ये सहभागी झाले  आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी. तो सध्या बिग बॉसमध्ये चांगलाच चर्चेत आहे. आता त्याने या शोमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.

बिग बॉस 17 शी संबंधित अपडेट्स शेअर करणाऱ्या एका फॅन पेजने मुनव्वर फारुकीच्या नवीन विक्रमाची माहिती  शेअर केली आहे. सोशल मीडियावर बिग बॉस १७ संदर्भात  फास्टेस्ट ट्रेंड मुनव्वर फारूकीने साध्य केला. बिग बॉस 17 च्या सर्व स्पर्धकांपैकी मुनव्वरबद्दल 100,000 ट्विट केले गेले आहेत.

 मुनव्वर फारुकी हा बिग बाॅस 17 मध्ये जबरदस्त गेम खेळताना दिसत असून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.  कंगना रनौतचा 'लॉकअप' हा कार्यक्रम त्याने जिंकला. स्टँडअप काॅमेडियन म्हणून सुरुवात करणाऱ्या मुनव्वर फारुकी यशाची नवनवीन शिखरं चढतोय. ओटीटी शो लाॅक अपनंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. आता 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तो सज्ज आहे.

टॅग्स :बिग बॉससेलिब्रिटी