Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sreejita De : Video - अभिनय सोडून परदेशात शिफ्ट होणार?; श्रीजीताचं वेडिंग कार्ड व्हायरल, अभिनेत्री म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 11:47 IST

Sreejita De : 16 वर्षांच्या कारकिर्दीत छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत.

श्रीजीता डे ही अत्यंत लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 16 वर्षांच्या कारकिर्दीत तिने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने लाखो लोकांची मनं जिंकली आहेत. सध्या अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिचा बॉयफ्रेंड मायकल बीपीसोबत ती लग्न करणार आहे. श्रीजीताचा होणारा पती मायकल हा जर्मनीचा आहे आणि ती स्वतः बंगाली कुटुंबातील आहे. त्यामुळेच हे कपल दोन्ही रितीरिवाजांनी लग्न करणार आहेत. 

पहिल्यांदा लग्न जर्मन रितीरिवाजांनुसार होईल. श्रीजीता सध्या तिच्या कुटुंबासह जर्मनीमध्ये आहे आणि 1 जुलै 2023 रोजी तिचं लग्न आहे. तिच्या लग्नाची पत्रिका समोर आली आहे, जी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. साध्या आणि मोहक आमंत्रण पत्रिकेमध्ये लग्नाचा प्रत्येक तपशील देण्यात आला आहे. 

पत्रिकेनुसार, जर्मनीच्या चर्चमध्ये 3 वाजता ट्रेडिशनल सेरेमनी होईल. त्यांची कॉकटेल आणि डिनर पार्टी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. मात्र, ट्रेडिशनल वेडिंगपूर्वी श्रीजिता आणि मायकल कायदेशीररित्या एकमेकांचे पती-पत्नी बनतील. दोघे 30 जून 2023 रोजी लीगल वेडिंग करणार आहेत. जेव्हापासून श्रीजीता डे हिचं लग्न ठरलं होतं, तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे की, ती अभिनय सोडून जर्मनीला शिफ्ट होईल का? 

अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून प्रतिक्रिया दिली. व्हिडिओमध्ये अभिनेत्री लेहेंगा-चोली परिधान केलेली दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'प्रत्येकजण विचारत आहे- लग्नानंतर तुम्ही जर्मनीला शिफ्ट होणार का?' यावर ती नाचत नो-वे म्हणताना दिसत आहे. त्यामुळे श्रीजिताच्या या व्हिडीओवरून ती जर्मनीला शिफ्ट होणार नाही आणि भारतात राहून तिची अभिनय कारकीर्द सुरू ठेवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

33 वर्षीय अभिनेत्रीने 2007 मध्ये 'कसौटी जिंदगी की'मधून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने 'लेडीज स्पेशल', 'मिले जब हम तुम', 'तुम ही बंधू सखा तुम्ही' आणि 'पिया रंगरेज' यांसारख्या डेली सोपमध्ये काम केलं. 'उतरन'मधील मुक्ताच्या भूमिकेतून तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. ती 'बिग बॉस 16' मध्येही दिसली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :टेलिव्हिजन