Join us
Daily Top 2Weekly Top 5

Uorfi Javed : उर्फी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानं Splitsvilla शो मधून झाली बाहेर? जाणून घ्या खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:18 IST

स्प्लिस्टविलामध्ये उर्फीच्या एंट्री घेतल्यानं हा सीझन चांगलाच गाजणार असं दिसतं होतं.. पण काही दिवसात उर्फी या शो मधून बाहेर आली आहे.

उर्फी जावेद (Uorfi Javed ) चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. अलीकडे उर्फी विरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर उर्फी जावेद चांगलीच संतापली होती. सोशल मीडियावर तिनं पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला. 

उर्फी स्प्लिट्सविलाचा 14 वा सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. पण काही दिवसात उर्फी या शो मधून बाहेर आली आहे. स्प्लिस्टविलामध्ये उर्फीच्या एंट्री घेतल्यानं हा सीझन चांगलाच गाजणार असं दिसतं होतं. उर्फीच्या एंट्रीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजात उर्फी हा सीझन चांगलाच गाजवणार अलं वाटत असतानाच उर्फी या शोमधून बाहेर पडली. 

स्ल्पिट्सविला 14 च्या अपकमिंग एपिसोडमध्येचा प्रोमो समोर आला आहे.  यात सनी लिओनीचा हॉट अंदाज पाहायला मिळणार आहे. ज्यात एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. पण कुठेच उर्फी दिसून येत नाहीये.यावरून उर्फीला शोमधून काढल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

उर्फी जावेद स्प्लिट्सविलामध्ये स्पर्धक म्हणून नाही तर मिसचीफ मेकर म्हणून आली होती. उर्फी काही दिवसांसाठी घरात राहणार होती. शोमधील सगळ्या स्पर्धकांमध्ये अचडणी निर्माण करण्याचं काम तिला देण्यात आलं होतं. उर्फीचं काम संपल्यामुळे ती शोमधून बाहेर आली आहे. 

उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच ती big boss बिग बॉस मध्येही होती. तिथुन तिला प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मध्ये ती केवळ एक आठवडा राहू शकली मात्र तिथेही तिच्या फॅशन सेन्स ने सर्वांना हैराण केले होते.   

टॅग्स :सनी लिओनीसेलिब्रिटी