Join us

'माझा होशील ना' मालिकेच्या चाहत्यांसाठी स्पेशल सरप्राईज, टीमने लढवली ही शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 14:05 IST

'माझा होशील ना' या मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'माझा होशील ना' या मालिकेनं सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेचे वेगळे कथानक आणि त्यातील कलाकारांची फौज यामुळे या मालिकेने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. मालिकेतील सई, आदित्य आणि नैना ही पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

लॉकडाऊनमुळे सर्व मालिकांचे चित्रीकरण देखील बंद आहे. त्यामुळे या मालिकेचे नवीन भाग प्रसारित होत नाही आहेत. पण गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी आणि मुग्धा पुराणिक या कलाकारांची चाहत्यांना आठवण येतेय. म्हणूनच मालिकेच्या टीमनं प्रेक्षकांसाठी एक सरप्राइज आणलं आहे. 

मालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर दोन वेबिसोड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये सई, आदित्य आणि नैना एकमेकांशी व्हिडीओ कॉलवर बोलताहेत.

तर दुसऱ्या एपिसोडमध्ये सई कॉफी करताना दिसतेय. हे सरप्राइज प्रेक्षकांनाही आवडलं आहे. प्रेक्षकांचा या वेबिसोड्सना चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे.

टॅग्स :झी मराठी