Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल पाच वर्षांनी साजरा केला विकास मानकताने आपला वाढदिवस,आई-वडिलांनी दिले हे खास गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2017 12:18 IST

टीव्ही कलाकारांना मालिकांच्या शूटिंगमुळे निवंता क्षणही कुटुंबासबोत घालवणे शक्य होत नाही. रोज 12 ते 15 शूटिंग शेड्युअल मुळे त्यांना ...

टीव्ही कलाकारांना मालिकांच्या शूटिंगमुळे निवंता क्षणही कुटुंबासबोत घालवणे शक्य होत नाही. रोज 12 ते 15 शूटिंग शेड्युअल मुळे त्यांना सुट्टी घेणेही अशक्य असते. ‘गुलाम’ या मालिकेत वीरची भूमिका साकारणा-या विकास मानकतालाही यावर्षी  त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन त्याच्या कुटुंबासह करायचे होते. मात्र मालिकेच्या टीमने त्याच्या भावना समजून त्याला सुट्टी दिली आणि त्यामुळेच  तीन दिवसाची सुट्टी घेत त्याने  आपला वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन केले. मानकतालाने आई-वडिलांबरोबर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी तीन दिवसांची सुटी घेतली होती. तब्बल पाच वर्षांनी त्याने आपला वाढदिवस आपल्या आई-वडिलांबरोबर साजरा केला आहे! दहा वर्षांपूर्वी विकास दिल्लीहून मुंबईत स्थायिक होण्यासाठी आला होता. आता त्याला आपल्या घरची खूपच ओढ लागली होती. त्यामुळे त्याने आपल्या आई-वडिलांना अनपेक्षित सुखद आश्चर्याचा धक्का देण्याचा निर्णय घेतला आणि पत्नी गुंजनसह तो दिल्लीला गेला. विकासला त्याच्या वाढदिवसाच्या योजनेविषयी विचारले असता, तो म्हणाला, “मला माझा वाढदिवस काही निवडक लोकांबरोबरच साजरा करायचा होता. माझे कुटुंबीय माझ्यासाठी माझे सर्वस्व आहेत.मलाही त्यांना सरप्राईज द्यायचे होते. म्हणूनच मी हा प्लॅन केला होता. जेव्हा माझ्या कुटुंबियांनी मला  अनपेक्षितपणे घरी आलेले पाहिल्यावर त्यांच्या चेह-यावर मला जो आनंद दिसला, तो मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. मी घेतलेल्या कष्टांचं चीज झाल्यासारखे वाटतंय. त्यांच्याबरोबर तीन दिवस एकत्र राहता यावं, यासाठी मी गुलाम मालिकेसाठी अधिक वेळ देऊन जास्तीचं शूटिंग केले होते.”विकास मानकताने लेफ्ट राईट लेफ्ट या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या भूमिकेचे कौतुक सगळ्यांनीच केले होते. या मालिकेमुळे विकास प्रकाशझोतात आला. त्यानंतर मैं ना भुलूंगी या मालिकेत तो झळकला. आता दोन वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर परतला आहे. या मालिकेत तो एका निर्दयी आणि कठोर स्वाभावाच्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. पण खऱ्या जीवनात या भूमिकेपेक्षा तो खूप वेगळा असल्याचे सांगतो. मी मालिकेत अतिशय निर्दयी असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच स्त्रियांना अतिशय तुच्छ वागवतो असे प्रेक्षकांना पाहायला मिळते. पण माझ्या खऱ्या आयुष्यात स्त्रियांचा खूप आदर करतो. मी स्त्रीहक्कवादी आहे. ही मालिका सगळ्याच वयोगटातील लोक आवडीने पाहातात. या मालिकेत महिलांना मिळणारी असमान वागणूक आणि त्यांना गुलामासारखे वागवण्यात येते यावर भाष्य करण्यात आले आहे.