Join us

आपल्या भूमिकेसाठी गौरव सरीन घेतोय अशी विशेष मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 09:57 IST

आपली भूमिका जास्तीत जास्त चांगली व्हावी यासाठी अभिनेता गौरव सरीन विशेष मेहनत घेत आहे. यात गौरव सरीन राधेची भूमिका साकारत आहे. नुकतेच त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत केल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगौरवने दुबईत काम करणाऱ्या आपल्या काही मित्रांची भेट घेतलीत्याने आखाती देशात राहून नोकरी करणं म्हणजे काय असतं, हे मित्राकडून जाणून घेतलं

स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आपली भूमिका जास्तीत जास्त चांगली व्हावी यासाठी अभिनेता गौरव सरीन विशेष मेहनत घेत आहे. यात गौरव सरीन राधेची भूमिका साकारत आहे. नुकतेच त्याने या भूमिकेसाठी विशेष मेहनत केल्याचे दिसून आले.

मालिकेच्या आगामी भागांमध्ये दिसेल की राधे हा स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करीत असून नोकरीसाठी तो दुबईला जाण्याची तयारी करीत आहे. पण आपली भूमिका वास्तववादी वाटावी, यासाठी गौरवने अलीकडेच आपल्या व्यग्र चित्रीकरणाच्या वेळापत्रकातून थोडा वेळ काढला. दुबईत नोकरी करणाऱ्यांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, याची माहिती करून घेण्यासाठी त्याने दुबईत काम करणाऱ्या आपल्या काही मित्रांची भेट घेतली. यासंदर्भात गौरव म्हणाला, “राधेच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. लहानपणापासून लाडात वाढलेला असल्याने त्याने आजवर जीवनात एकदाही कोणतंही काम केलेलं नाही की नोकरी केलेली नाही. पण आता या मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून राधे हा चक्क दुबईत नोकरी करणार आहे. या भूमिकेला पूर्ण न्याय देण्यासाठी मी माझ्या एका लपणापासूनच्या मित्राशी संपर्क साधला. तो दुबईत नोकरी करतो. पण आखाती देशात राहून नोकरी करणं म्हणजे काय असतं, ते मला जाणून घ्यायचं होतं. या मित्राने मला तिथल्या नोकरीची परिस्थिती सांगितली आणि तिथल्या संस्कृतीची माहिती दिली. प्रेक्षकांना आता राधेची ही नोकरदार माणसाची बाजू कशी वाटते, ते जाणून घेण्यास मी फार उत्सुक आहे.” याआधी ही गौरव सरीन मालिकेतील एका खास दृश्यासाठील वजन वाढवावले होते.  

टॅग्स :स्टार प्लस