Join us

​​अभिनवसाठी स्पेशल केक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2016 17:07 IST

शक्ती...अस्तित्व के एहसास की या मालिकेतील रुबिना दिलाईकने तिचा प्रियकर अभिनव शुक्लाच्या वाढदिवसाला एक छान सरप्राईज दिले. अभिनव आणि ...

शक्ती...अस्तित्व के एहसास की या मालिकेतील रुबिना दिलाईकने तिचा प्रियकर अभिनव शुक्लाच्या वाढदिवसाला एक छान सरप्राईज दिले. अभिनव आणि रुबिना अभिनवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला जाणार होते. दुबईला जातना विमानतळावरच रुबिनाने अभिनवला केक कापायला लावला. हा केक रुबिनाने स्वतः बनवला होता. अभिनव आपल्या तब्येतीच्या बाबतीत खूपच सतर्क आहे. त्यामुळे केक बनवताना या गोष्टी तिने ध्यानात ठेवल्या होत्या. एवढेच नव्हे तर अभिनवचे नाक मोठे असल्याने ती लाडाने त्याला डुक्कर म्हणते. त्यामुळे तिने डुक्करचा चेहरादेखील केकवर काढला होता. रुबिनाने दिलेल्या या सरप्राईजमुळे अभिनव खूपच खूश झाला असल्याचे सांगतो.