‘दिल है हिंदुस्तानी’मध्ये गुरू रंधावा आणि यो यो हनिसिंग यांची विशेष उपस्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 12:07 IST
छोट्या पडद्यावरील ‘दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.या कार्यक्रमामुळे जगभरातून आलेल्या अनेक गुणवान ...
‘दिल है हिंदुस्तानी’मध्ये गुरू रंधावा आणि यो यो हनिसिंग यांची विशेष उपस्थिती?
छोट्या पडद्यावरील ‘दिल है हिंदुस्तानी’ या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.या कार्यक्रमामुळे जगभरातून आलेल्या अनेक गुणवान गायकांची सुर रसिकांना मंत्रमुग्ध करतील असा निर्मांत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.जगभरातून आलेले विविध गायक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकी कौशल्याने एकमेकांशी स्पर्धा करतील.त्यांच्यातील सर्वोत्तम गायकाच्या निवडीसाठी बादशहा, सुनिधी चौहान आणि प्रीतम हे दिग्गज गायक स्पर्धकांना जज करणार आहेत.आता या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना मधूनच सुखद आश्चर्याचा धक्का देण्याची आयडीयाची कल्पना निर्मात्यांनी आखली असल्याचे माहिती मिळते आहे.या कार्यक्रमाच्या मंचावर बादशहा दोन प्रसिध्द पंजाबी गायकांना आमंत्रित करणार आहे.ज्या गायकाने पंजाबी रॅप संगीत हिंदी चित्रपटात आणले तो यो यो हनिसिंग आणि अलीकडच्या काळात अनेक गाजलेल्या उडत्या चालीच्या गीतांमधील आवाज म्हणजेच गुरु रंधावा. हे दोन लोकप्रिय गायकही जजच्या खुर्चीत बसतील.सूत्रांनी सांगितले की,“बादशहा आणि हे दोन पंजाबी गायक आपल्या गाजलेल्या गाण्यांने सा-यांचे मनोरंजन तर करतीलच आणि त्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांना योग्य ते मार्गदर्शनही करतील.या कार्यक्रमात सर्वांना एकाच मंचावर एकत्र आलेले पाहणे फारच रंजक आणि जोशपूर्ण असणार हे मात्र नक्की. या तिघांच्या एकत्र येण्यामुळे या कार्यक्रमाचा दर्जाही निश्चितच उंचावणार आहे.” हे तिघे एकत्र गाताना व्यासपिठावर ठेकेदार संगीताचा जल्लोष होईल.गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय,चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा.त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत.त्यामुळेच की काय बॉलिवूड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे.‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात रेखा यांचाही सेलिब्रिटी परीक्षक म्हणून समावेश केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या मंचावर रेखाच्या उपस्थितीमुळे नवी उत्साह पाहायला मिळेल.रेखा यांच्यामुळेच सारेच खूप उत्सुक आहेत.एकुणच काय तर ‘दिल है हिंदुस्तानी-2’चा दुसरा सिझन रसिकांसाठी ग्लॅमर आणि मनोरंजनाची एक पर्वणीच ठरणार आहे.