Join us

लैंगिक शोषणावर बिनधास्त बोलली श्रृती सेठ; पीएम मोदींच्या अभियानावरही केली टीका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 18:59 IST

प्रसिद्ध निर्माता हार्वे वायंस्टीन यांच्या विरोधात अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने संपूर्ण हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या ...

प्रसिद्ध निर्माता हार्वे वायंस्टीन यांच्या विरोधात अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने संपूर्ण हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर जगभरात सध्या #MeeToo या नावाने एक अभियान चालविले जात आहे. आतापर्यंत या  अभियानांतर्गत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासोबत झालेल्या दुष्कृत्याची जाहीरपणे सोशल मीडियावर वाच्यता केली आहे. बॉलिवूडमधीलही काही अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. आता या सेलिब्रिटींमध्ये आणखी एक नाव जोडले आहे. होय, राधिका आपटे, टिस्का चोपडा यांच्यानंतर अभिनेत्री आणि होस्ट श्रृती सेठ हिने इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणावर आपले मत मांडले आहे. श्रृतीने गेल्या मंगळवारी आपल्या आॅफिशियल ट्विटर हॅण्डलवर एका मॅग्झीनची लिंक शेअर करताना ट्विट केले की, जर हॉलिवूडला लैंगिक शोषणाविरोधात बोलण्यासाठी दोन दशकांचा वेळ लागला, तर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किती वेळ लागेल? श्रृतीने पुढे लिहिले की, मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे की, हॉलिवूडमधील घाणेरडे रहस्य उलगडण्यासाठी २५ वर्षांचा अवधी लागला. मग बॉलिवूडमध्ये किमान ५० वर्ष लागतील, असे समजायला हरकत नाही. }}}} २०१५ मध्ये श्रृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #SelfieWithDaughter या अभियानावरही टीका केली. ज्यामुळे सध्या ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. मात्र श्रृतीने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर दिले. ‘मन’ या मालिकेत छोट्या पडद्यावर प्रवास करणाºया श्रृतीने होस्ट म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे. श्रृती ‘राजनिती, फना आणि वैसा भी होता है’मध्ये बघावयास मिळाली आहे.