Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अल्लादिन' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 08:15 IST

'अल्लादिन' ही एका वीस वर्षांच्या कल्पनारम्य मुलाची, अल्लादिनची गोष्ट आहे, त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि नशीबाची गोष्ट आहे.

ठळक मुद्दे'अल्लादिन' मालिका २१ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीलाअल्लादिनच्या भूमिकेत सिद्धार्थ निगम

'अल्लादिन' म्हटलं की डोळ्यासमोर येते आखाती देशांमधले उंची राजवाडे, लांबच लांब पसरलेली वाळवंटं, उडता गालिचा आणि अर्थात जिनीचा जादूचा दिवा. सोनी सब पुन्हा एकदा प्रेक्षकांना या थरारक गोष्टीची सफर घडवून आणणार आहे. अल्लादिन : नाम तो सुना होगा ही मालिका सुरू करण्यात येत आहे. यात अचंबित व्हायला लावणारी जादू असेल आणि रहस्यही असेल. ही एका वीस वर्षांच्या कल्पनारम्य मुलाची, अल्लादिनची गोष्ट आहे, त्याच्या आयुष्यातील प्रेम आणि नशीबाची गोष्ट आहे. ही मालिका २१ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त सोनी सबवर पाहता येणार आहे.

पेनिनसुला पिक्चर्सच्या निस्सार परवेझ आणि अलिंद श्रीवास्तव यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. अल्लादिनची भूमिका सिद्धार्थ निगम यांनी साकारली आहे. आपल्या गोड गोड बोलण्याने आणि हुशारीने तो आपली कामे अतिशय कौशल्याने पूर्ण करून घेतो, हाच या पात्राचा करिष्मा आहे. तो अतिशय गोड प्रकारे रफटफ आहे आणि प्रेम करण्यात फारच बुद्धू, त्याचे काका आणि काकू भूतकाळात कुटुंबासाठी केलेल्या उपकाराची शपथ घालून जबरदस्तीने त्याला चोर बनायला भाग पाडतात. त्याचे त्याच्या अम्मीबरोबर फारच सुरेख नाते आहे, अम्मी त्याची ताकद आहे. अम्मीची भूमिका स्मिता बन्सल यांनी साकारली आहे. अल्लादिनची जोडीदार यास्मिन, बगदादच्या सुंदर राजकन्येची भूमिका अवनीत कौरने साकारली आहे. ही काही नाजूक राजकन्या नाहीये, ती एक फायटर आहे, चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणारी मुलगी आहे ही. स्वतःचे संरक्षण करणे आणि उत्तम लढणारी यास्मिन अल्लादिनच्या आयुष्यात प्रेम आणि थरार दोन्हींची भर घालते. याबरोबरच अल्लादिनचे वडील हे आणखी एक महत्त्वाचे पात्र आहे. ओमकार (गिरीश सचदेव) हे पात्र म्हणजे अनेक कठीण काळातून गेलेली व्यक्ती आहे आणि त्यांची अल्लादिनच्या भविष्यात फार महत्त्वाची भूमिका आहे, त्यांच्यामुळे अल्लादिनचे भविष्य चमकणार आहे. याबरोबरच या कार्यक्रमात झाफर (अमीर दळवी), अल्लादिनबरोबर सातत्याने लढणारा दुष्ट राक्षस वझीर, त्याचा चापलूस चाचा (बदरूल इसलाम) आणि चाची (गुलफाम खान) आणि यास्मिनचे आई-वडिल सुलतान शेहनवाझ (ज्ञान प्रकाश) आणि सुलताना (याशु धिमान) अशी अनेक लोकप्रिय पात्र समाविष्ट आहेत. अल्लादिनच्या थरारांमुळे त्याला `चिराग’ हा जादूचा दिवा मिळतो, या दिव्याभोवतीच हे कथानक फिरत असते.

टॅग्स :सोनी सब