Join us

सोनी रजनानचे होणार छोट्या पडद्यावर पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 15:45 IST

सोनी राजदान यांनी नव्वदीच्या दशकात अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्यांच्या बुनियाद, जुनून, फिर एक दिन यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ...

सोनी राजदान यांनी नव्वदीच्या दशकात अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्यांच्या बुनियाद, जुनून, फिर एक दिन यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण त्या गेल्या कित्येक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहेत. ऐसा देश है मेरा या मालिकेत त्या अखेरच्या झळकल्या होत्या. पण आता त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थ पी. मल्होत्रा आगळ्या वेगळ्या विषयावर एक मालिका घेऊन येत आहे आणि या मालिकेद्वारे सोनी राजदान छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. या मालिकेचे नाव उतरे ना रंग माही असे ठेवणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत प्रेक्षकांना एका राजघराण्याची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सोनी राजघराण्यातील महिलेची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेबद्दल सोनी सांगतात, "या मालिकेची संकल्पना मला खूप वेगळी वाटल्यामुळे ही मालिका करण्याचा विचार मी केला. छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना एखाद्या चांगल्या भूमिकेद्वारेच परतायचे असे मी आधीच ठरवले होते. मला या मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेतील माझी भूमिका सांगितल्यावर मला ती खूपच इंटरेस्टिंग वाटली आणि त्यामुळेच मी ही मालिका करण्याचे ठरवले." या मालिकेचे चित्रीकरण सध्या कर्जत येथे सुरू असून या मालिकेचा भव्य सेट तिथे उभारण्यात आला आहे. अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ या मालिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेच्या सेटवर नुकताच एक साप दिसल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. किथ सिक्वेरा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. त्याच्या खोलीच्या बाहेर हा साप आला होता.