सोनू सूद झळकणार कॉमेडी दंगलमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 12:24 IST
सोनू सूदने आजवर अनेक हिंदी, दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपटात यश मिळाल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला. ...
सोनू सूद झळकणार कॉमेडी दंगलमध्ये?
सोनू सूदने आजवर अनेक हिंदी, दाक्षिणात्य, पंजाबी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य चित्रपटात यश मिळाल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला. शहीद ए आझम या चित्रपटात त्याने भगत सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केले नसले तरी सोनूच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. युवा या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याच्या नावाची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर त्याने जोधा अकबर, सिंग इज किंग यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण दबंग चित्रपटात त्याने साकारलेला छेदी सिंग लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. या चित्रपटाने सोनूच्या करियरला एक वेगळी दिशा दिली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सध्या तो त्याच्या मनकर्णिकाः द क्वीन ऑफ झासी या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. या चित्रपटात तो एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.सोनू गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर काम करत आहे. मोठ्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर सोनू आता छोट्या पडद्याकडे वळणार आहे. तो लवकरच एका कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. कॉमेडी दंगल हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या काही महिन्यांपूर्वी भेटीस आला होता. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगली लोकप्रियता मिळाली होती. या कार्यक्रमाचा पहिला सिझन लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्यानंतर लवकरच दुसरा सिझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कॉमेडी दंगलच्या दुसऱ्या सिझनसाठी परीक्षक म्हणून सोनू सुदचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. त्याच्यासोबत भारती सिंग, अन्नू मलिक हे देखील परीक्षकांच्या खुर्चीत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. कॉमेडी दंगलचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार याबाबत लोकांना उत्सुकता लागलेली आहे. पण हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस केव्हा येणार याबाबत टीमने मौन राखणेच पसंत केले आहे.सध्या बॉलिवूडमधील आमिताभ बच्चन, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार यांसारखे अनेक कलाकार छोट्या पडद्यावर दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये आता सोनू सूदचा समावेश होणार आहे. Also Read : पी. व्ही. सिंधुच्या बायोपिकसाठी सोनू सूदची दीपिकाला पसंती