Join us

सोनू निगमची पत्नी मधुरिमाने सांगितले त्याचे हे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 20:22 IST

सोनू निगम आणि त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीने म्हणजे मधुरिमा निगमने मंचाची शोभा वाढवली आणि एकमेकांच्या जीवनातील काही गंमतीदार सवयी सांगून कार्यक्रमात रंगत आणली.

ठळक मुद्दे“सोनू विशेषतः जेव्हा आपले सामान बॅगेत भरत असतो, तेव्हा ‘दिल्ली वाली आंटी किंवा तिची मुलगी’ त्याच्या अंगात संचारते. तो त्यांच्यासारखे वागू लागतो आणि माझी हसून हसून मुरकुंडी वळते.

कपिलचा द कपिल शर्मा शोचा दुसरा भाग प्रेक्षकांना सध्या पाहायला मिळत असून या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील टिकून आहे. या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात प्रेक्षकांना सोनू निगम पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात तो पत्नीसोबत हजेरी लावणार आहे. कपिल आणि त्याच्या टीमसोबत सोनू आणि त्याची पत्नी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. तसेच सोनू त्याची प्रसिद्ध गाणी गाऊन उपस्थित लोकांचे मन जिंकणार आहे. सोनू निगम आणि त्याच्या सोबत आलेल्या त्याच्या पत्नीने म्हणजे मधुरिमा निगमने मंचाची शोभा वाढवली आणि एकमेकांच्या जीवनातील काही गंमतीदार सवयी सांगून कार्यक्रमात रंगत आणली. एका पत्नीला आपल्या पतीच्या सर्व बर्‍या वाईट सवयी माहीत असतात आणि ती दररोज त्या हाताळत असते. मधुरिमाने सोनूच्या अशाच एका सवयीबद्दल सांगितले. ती म्हणाली, “सोनू विशेषतः जेव्हा आपले सामान बॅगेत भरत असतो, तेव्हा ‘दिल्ली वाली आंटी किंवा तिची मुलगी’ त्याच्या अंगात संचारते. तो त्यांच्यासारखे वागू लागतो आणि माझी हसून हसून मुरकुंडी वळते. तो दिल्लीच्या आंटीच्या भूमिकेत जातो, त्यांच्यासारखे दिलदार होऊन वर्तन करू लागतो किंवा त्यांच्या मुलींसारखे वागू लागतो व त्यांच्या बोलण्या-चालण्याची नक्कल करू लागतो.” मग सोनू निगमने सर्व प्रेक्षकांसमोर दिल्ली वाली आंटी सादर करून दाखवली आणि त्यांना खूप हसवले. या बहुमुखी प्रतिभा असलेल्या गायकाचा केवळ गळाच गोड नाही तर त्याच्यात अभिनय कौशल्यही आहे आणि आपल्या पत्नीला आणि मुलाला कसे हसवायचे हे त्याला व्यवस्थित ठाऊक आहे.

द कपिल शर्मा या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, रोचेल राव यांसारखे पहिल्या सिझनमधील कलाकार तर भारती सिंग, कृष्णा अभिषेक यांसारखे नवीन कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवत आहेत. सोनू निगमचे अभिनय कौशल्य प्रेक्षकांना द कपिल शर्मा शोमध्ये या शनिवारी रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सोनू निगमद कपिल शर्मा शो