Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनारकलीच्या भूमिकेसाठी सोनारिका भदोरियाने गिरवले कथ्थकचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 06:00 IST

दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली या नवीन प्रस्तावातून कलर्सने एक महान प्रेमकथा पुन्हा जिवंत केली आहे.

दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली या नवीन प्रस्तावातून कलर्सने एक महान प्रेमकथा पुन्हा जिवंत केली आहे. तरूण मुघल राजकुमार सलीम आणि त्याची दुर्दैवी कनीज अनारकली यांच्यातील एकमेकांच्या प्रेमाची कहाणी या मालिकेमध्ये सुंदररित्या निवेदन केलेली आहे. सोनारिका भदोरिया यात अनारकलीची भूमिका साकारते आहे तर शाहीर शेख सलीमच्या भूमिकेत दिसणार आहे.  

मालिकेतील कलाकार आणि टीमने कथा आणि पात्र हुबेहुब दिसण्यासाठी कोणतिही कसर सोडली नाही. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. बोलणे, दिसणे आणि पोशाख अशा वेगवेगळ्या गोष्टी हा पिरीयड ड्रामा सादर करण्यासाठी या सर्व कुशल अभिनेत्यांनी काम केलेले आहे. अनारकलीच्या भूमिकेची तयारी करत असताना, कुशल सोनारिका भदोरिया आता कथ्थक शिकत आहे तसेच थोडेसे उर्दुसुध्दा शिकत आहे. उत्तेजित झालेली सोनारिका भदोरिया म्हणाली, “जेव्हा मी या मालिकेसाठी होकार दिला तेव्हा मी या भूमिकेत सुलभता येण्यासाठी कथ्थक शिकण्याचे ठरविले होते.  कनीज म्हणून मला कथ्थक छान येणे अपेक्षित होते. कथ्थक हा नृत्य प्रकार शिकायला अतिशय अवघड आहे, तो दिसायला सोपा आहे पण जेव्हा तुम्ही सुरूवात करता तेव्हा त्यात एकाग्रता आणि तुमच्या हातापायांच्या समन्वयाची गरज असते. मला वैयक्तिक हे कौशल्य शिकताना आनंद वाटला आणि मी ते पुढेही शिकणे चालू ठेवणार आहे. ही भूमिका माझ्यासाठी अतिशय विशेष आहे आणि अनारकलीची प्रख्यात भूमिका साकारण्याचा टप्पा मी गाठला याचा मला आनंद झाला आहे. 

टॅग्स :दास्तान-ए-मोहब्बतरंग