Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनारिकाने मानेवर गोंदला टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 20:46 IST

‘देवो के देव महादेव’ या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सोनारिका भदौरिया तिच्यातील मॉडलिंग स्वभावालादेखील ओळखली जाते. नुकताच ...

‘देवो के देव महादेव’ या मालिकेत पार्वतीची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री सोनारिका भदौरिया तिच्यातील मॉडलिंग स्वभावालादेखील ओळखली जाते. नुकताच तिने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, ज्यामध्ये तिच्या गळ्यावर ‘वांडरलस्ट’ नावाचा टॅटू बनविलेला असल्याचे दिसत आहे.सध्या सोनारिका तिच्या ‘सॉँसे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २०११ मध्ये सोनारिकाने ‘तुम देना साथ मेरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘देवो के देव महादेव’ या प्रसिद्ध मालिकेत पार्वतीच्या भूमिकेत झळकली. खरं तर या मालिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र मालिकेबरोबरच ती तिच्या बोल्ड अंदाजामुळेही चर्चेत आली. सोनारिकाने गळ्यावर गोंदलेला टॅटूगेल्या मे महिन्यात जेव्हा तिने तिचे बिकिनीतील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले होते, तेव्हा तिला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावर सोनारिकानेदेखील जशास् तसे उत्तर देताना लिहिले होते की, ‘मला अजूनही समजत नाही की, आपण कुठल्या जगात जगत आहोत. वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक बॉडी शेमिंगसाठी लढत आहेत, मात्र आपल्या देशात मुलीने बिकिनी घालणे गुन्हा ठरत आहे’. सोनारिकाने पार्वतीची भूमिका साकारल्यानेच तिला लोकांचा रोष सहन करावा लागल्याने नंतर बोलले गेले. मात्र अशातही सोनारिकाने तिचा मॉडर्न अंदाज कमी केला नाही. आजही ती याच अंदाजात वावरत आहे. नुकताच तिने मानेवर टॅटू गोंदल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या टॅटूचा अर्थ ‘प्रवासाचा आनंद घ्या’ असा होतो.