सोनालिका बनली लेखिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 16:24 IST
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी ही सध्या लिखाणात व्यग्र आहे. याविषयी ...
सोनालिका बनली लेखिका
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत माधवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी ही सध्या लिखाणात व्यग्र आहे. याविषयी सोनालिका सांगते, मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान मला खूप सारा वेळ मिळतो.तो वेळ वाया न घालवता मी त्या वेळात काही ना काही तरी लिहित असते. सध्या मी दोन-तीन कथा लिहित असून यासाठी मी विविध लोकांना आणि ठिकाणांना भेटी देत आहे. तसंच काही लोकांचे मार्गदर्शनही घेत आहे. माझ्या एक कथेवर चित्रपटही बनवला जाणार आहे. पण अद्याप सगळ्या गोष्टी प्राथमिक टप्प्यावर आहेत.