सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दिसणार छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 13:01 IST
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यावर बरोबरच छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय दिसते आहे. छोट्या पडद्यावर ...
सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दिसणार छोट्या पडद्यावर
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यावर बरोबरच छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय दिसते आहे. छोट्या पडद्यावर ही सोनाक्षीला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे. छोट्या पडद्यावर ती सगळ्यांची फेव्हरेट अभिनेत्री बनली आहे. दोन वर्षांपूर्वी इंडियन आयडॉलमधून छोट्या पडद्यावर तिने पदार्पण केले होते. नुकतीच ती नच बलियेच्या आठव्या सीजनमध्ये परीक्षकाच्या खुर्चीवर दिसली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षी एका आगामी टीव्ही शोमध्ये पुन्हा एकदा परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ओम शांती ओम' असे या रिअॅलिटी शोचे नाव आहे. या शोचे महागुरु म्हणून बाबा रामदेव बसणार आहेत. या शोला घेऊन सोनाक्षी सिन्हा खूपच एक्साइटेड दिसते आहे.बाब राम देव यांच्यासोबत स्टेज शेअर करायला सोनाक्षी सिन्हा उत्साहित आहे. डीएनए या वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार सोनाक्षीला जेव्हा या शोची ऑफर देण्यात आली होती तेव्हा सुरुवातीला तिने नकार दिला होता. तिला हा शो करायचा नव्हता. यानंतर सोनाक्षीचा मू़ड चेंज झाला आणि तिने या शोमध्ये परीक्षक बनण्यासाठी मेकर्सकडे एक चांगली मोठी रक्कम मागितली. मेकर्सनी सोनाक्षीची ही मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे ती लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ALSO READ : ‘या’ चित्रपटातून डेब्यू करणार बाबा रामदेव; ‘या’ अभिनेत्रींच्या असतील प्रमुख भूमिका !सध्या सोनाक्षी तिचा एक्स बॉयफ्रेंड बंटी सचदेवला घेऊनदेखील चर्चेत होती. अरबाज खानच्या बर्थ डे पार्टीत दोघे ही उपस्थित होते. सोनाक्षी बंटीला टाळण्याचा प्रयत्न करीत होती, तर बंटी तिच्या आजूबाजूलाच उभा असल्याचे दिसत होते. संपूर्ण पार्टीदरम्यान सोनाक्षी खूपच अस्वस्थ दिसली. बंटी सोनाक्षीचा मॅनेजर होता. तो तिच्या प्रत्येक असायमेंट हॅण्डल करीत होता. बंटीशी ब्रेकअप झाल्यानंतर सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा तिच्या मॅनेजमेंटचे काम करीत आहे.