थुकरटवाडीत सोनमचा जलवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 03:10 IST
बॉलीवुडची मसककली सोनम कपुरने तिच्या अदांनी अन अभिनयाने फक्त बॉलीवुडच नाही तर मराठी प्रेक्षकांना ...
थुकरटवाडीत सोनमचा जलवा
बॉलीवुडची मसककली सोनम कपुरने तिच्या अदांनी अन अभिनयाने फक्त बॉलीवुडच नाही तर मराठी प्रेक्षकांना देखील भुरळ पाडली आहे. तिच्या नीरजा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती चक्क थुकरटवाडीत अवतरली अन सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. सोनम नूकतीच चला हवा येऊ द्या या शो मध्ये नीरजा च्या प्रमोशनसाठी आली होती. लाल रंगाच्या लाँग कुरत्यामध्ये तिचे रुप अधिकच खुलुन दिसत होते. मिस्टर इंडिया चित्रपटातील काही सीन तिच्या समोर विनोदीरीत्या सादर केल्या नंतर ती खळखळून हसली. थुकरटवाडीत येऊन सोनमने चार चाँद लावले असे म्हणायला काहीच हरकत नाही.