Join us

कोणाला करायचंय डाएट तर कुणाला फिरायचंय जगभर, कलाकारांनी नवीन वर्षासाठी केलेत हे संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:17 IST

नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो मग तो एक साधारण व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊया काय आहेत ते संकल्प आणि त्यासाठी त्यांची काय तयारी आहे.

नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो मग तो एक साधारण व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊया काय आहेत ते संकल्प आणि त्यासाठी त्यांची काय तयारी आहे.  'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील लीला म्हणजेच वल्लरी विराज म्हणाली की,  "माझ्या २०२५ च्या टू डू लिस्टमध्ये सर्वात पहिले आहे कत्थक विषारद परीक्षा जी मला द्यायची आहे. २०२४ मध्ये मला परिक्षा द्यायची होती पण 'नवरी मिळे हिटलरला' मालिका मिळाली आणि त्याच्या शूटमध्ये मला वेळ काढता आला नाही. माझी विशारद पूर्ण करायची तयारी सुरु आहे. त्यासोबत मला वाचनाची सवय लावून घ्यायची आहे, तब्बेतीची काळजी घ्यायची आहे."

'सावळ्याची जणू सावली'मध्ये सावलीची भूमिका साकारत असलेली प्राप्ती रेडकर म्हणाली, "२०२५ मध्ये ज्या टॉप ३ गोष्टी  करायच्या आहेत त्या मधली पहिली मला फिट राहायचे आहे. मला प्रॉपर डाएट करायचे आहे कारण त्यात मी झिरो आहे. दुसरी आळशीपणा न करता मला माझं स्पोर्ट्स चालू ठेवायचे आहे आणि तिसरी ही की आई- बाबांना अभिमान वाटेल असे काम करत राहायचे आहे."

'लाखात एक आमचा दादा'मधील तुळजा म्हणजेच दिशा परदेशी म्हणते, " माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे त्यामुळे मी नवीन वर्षात कामाशी जोडलेल्या सर्व गोष्टी करणार आहे. जेवढं जास्त आणि उत्कृष्ट काम करता येईल तेवढं करणार आहे. स्वतःवर मेहनत घेणार आहे. मला माझं एक स्थान  निर्माण करायचे आहे.  दुसरी गोष्ट ही कि मी एक ट्रॅव्हलर आहे तर  अगदी ४ दिवसांची सुट्टी जरी मिळाली तरीही एखादं देश मी एक्सप्लोर करीन २०२५ मध्ये."

'लक्ष्मी निवास' मधली जान्हवी म्हणजेच दिव्या पुगावकर म्हणाली, "पाहिलं तर मला ड्रायविंग शिकायचे आहे.  मी कत्थक क्लासेस सुरु केले होते तर ते ही अर्धवट राहिले आहे, ते पूर्ण करणार आहे. मला डांस मध्ये एक प्रकार तरी शिकायचा आहे मग तो बॉलीवूड असो किंवा सेमी क्लासिकल. तिसरी गोष्ट अशी कि मला वाचनाची आवड नाहीये, त्यामुळे  सुरु वाचनाची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करीन."

'लक्ष्मी निवास' मधली भावना उर्फ अक्षया देवधरने सांगितले, "२०२५ मध्ये मला माझा व्यवसाय वाढवायचा आहे, दुसरी गोष्ट आता कामात ब्रेक नाही आणि 'लक्ष्मी निवास' मध्ये छान काम करायचे आहे. तिसरी गोष्ट, मला माझं वजन कमी करायचे आहे, ज्यासाठी मी डाएट आणि वर्कआऊट दोन्हीही सुरु केले आहे."

'लक्ष्मी निवास'मधली लक्ष्मी साकारत असलेली हर्षदा खानविलकर म्हणाल्या की,"नवीन वर्षाची सुरुवात अगदीच उत्तम झाली आहे मी 'लक्ष्मी निवास' मध्ये लक्ष्मी म्हणून एक वेगळी भूमिका साकारत आहेत तर माझा प्रयत्न आहे कि मी मला अधिक  छान काम करता आलं पाहिजे आणि ते लोकांना आवडेल याची  अपेक्षा आहे. शूटिंगमधून  वेळ मिळाला की ट्रॅव्हलही करीन. तसं माझं स्वप्न आहे जगभर फिरायचे. मी कॉलेज काळातल्या कादंबरीमध्ये वाचलेल्या काही जागा आहेत जिथे मला जायचे आहे. पण सध्या 'लक्ष्मी निवास' माझं प्राधान्य आहे."

टॅग्स :अक्षया देवधरझी मराठीनववर्षाचे स्वागत