Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:14 IST

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील देव, सोनाक्षी या व्यक्तिरेखा ...

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या मालिकेतील देव, सोनाक्षी या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेने शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिस यांना रातोरात स्टार बनवले. तसेच या मालिकेतील सुप्रिया पिळगांवकर यांच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपून काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेचे फॅन्स या मालिकेला चांगलेच मिस करत आहेत. या मालिकेच्या फॅन्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोनी वाहिनीवर पहरेदार पिया की आणि द कपिल शर्मा शो या दोन कार्यक्रमांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यामुळे आता आपला टिआरपी वाढवण्यासाठी आणखी काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा विचार या वाहिनीच्या टीमकडून केला जात आहे. त्यामुळे आता कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका जिथे संपली, त्याच्या पुढचा प्रवास प्रेक्षकांना या नव्या सिझनमध्ये पाहायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. हा नवा सिझन काहीच भागांचा असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील प्रेक्षकांना तीच टीम पाहायला मिळणार असून लवकरच चित्रीकरणाला सुरुवात केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. टेलीचक्कर या वेबसाईटशी बोलताना कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेचे निर्माते यश पटनाईक यांनी या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले आहे. या मालिकेचा दुसरा सिझन दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. Also Read : कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम शाहीर शेख झळकणार या चित्रपटात