'कुछ रंग प्यार के ऐसे भी' फेम एरिका फर्नांडिस रिअल लाईफमध्ये आहे इतकी ग्लॅमरस,दिसला बिकनी अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 13:05 IST
एरिकाने मालिका व्यतिरिक्त हिंदी,तामिळ,तेलुगु आणि कन्नड सिनेमातही तिने काम केले आहे.2011 मध्ये पार पडलेल्या फेमिना मिस इंडियातही ती सहभागी झाली होती.
'कुछ रंग प्यार के ऐसे भी' फेम एरिका फर्नांडिस रिअल लाईफमध्ये आहे इतकी ग्लॅमरस,दिसला बिकनी अवतार
छोट्या पडद्यावरील 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेतून घराघरात पोहचलेली एरिका फर्नांडिस सध्या काय करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला असणार.कारण ही मालिका संपल्यानंतर तिचे दर्शन छोट्या पडद्यावर घडलेच नाही.त्यामुळे आपले आवडते कलाकार शूटिंग व्यतिरिक्त काय काय करतात हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.खास एरिकाच्या फॅन्ससाठी ती सध्या मस्त सुट्टीचा आनंद लुटत आहे.अंदमान निकोबार येथे ती तिच्या कुटुंबियांसोबत निसर्गाच्या सानिध्यात निवांत वेळ घालवत आहे.ऑनस्क्रीन एरिका अगदी सिंपल लूकमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र रिल लाईफ जितकी सुंदर दिसते अगदी त्याचप्रमाणे रिअल लाईफ अंदाजही तितकाच घायाळ करणारा आहे. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे.दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे.एरिका सिंपल बबली गर्ल लूकमुळे चर्चेत होती अगदी त्याचप्रमाणे आता ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी चर्चेत असते.तिने इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.एरिका अभिनयाव्यतिरिक्त मॉडेलिंगही करते.नुकतेच तिने एका शॉपिंग पोर्टलसाठी खास फोटोशूट केले आहे.यांत ती खूपच स्टायलिश दिसते आहे.तिच्या लूकलाही चाहते खूप लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.एरिकाने मालिका व्यतिरिक्त हिंदी,तामिळ,तेलुगु आणि कन्नड सिनेमातही तिने काम केले आहे.2011 मध्ये पार पडलेल्या फेमिना मिस इंडियातही ती सहभागी झाली होती.Also Read:'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेतील या टीव्ही कपलने गुपचुप उरकला साखरपुडा! 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.या मालिकेतील देव, सोनाक्षी या व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेने शाहीर शेख आणि एरिका फर्नांडिस यांना रातोरात स्टार बनवले. तसेच या मालिकेतील सुप्रिया पिळगांवकर यांच्या भूमिकेचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपून काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेचे फॅन्स या मालिकेला चांगलेच मिस करत आहेत. या मालिकेच्या फॅन्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.