Soham Bandekar And Pooja Birari Lovestory: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी गतवर्षी २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. लोणावळामध्ये मोठ्या थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. बांदेकरांच्या लाडक्या लेकाच्या लग्नाला कलाविश्वातील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. या जोडप्याच्या लग्नाची इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा रंगली. मात्र, सोहम आणि पूजाची पहिली भेट कुठे झाली. शिवाय त्यांच्या लव्हस्टोरीला कशी सुरुवात झाली? याबद्दल जाणून घेण्यास चाहते देखील उत्सुक होते. अखेर लग्नानंतर या जोडप्याने एकत्र मुलाखत देत त्यांच्या लव्हस्टोरीविषयी मोकळेपणाने सांगितलं आहे.
अलिकडेच पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली.या मुलाखतीत सोहम खुलासा करत म्हणाला,ऑलमोस्ट सुफळ संपन्ना नावाची एक मालिका होती, ज्यामध्ये पूजाने कॅमिओ केला आहे.त्या मालिकेचं घोडबंदरला शूटिंग व्हायचं. तेव्हा मी पूर्णवेळ निर्माता म्हणून काम देखील करत नव्हतो. मी फक्त रोजचा खर्च मॅनेज करतो. तेव्हा मी कॉलेमध्ये होतो. त्यावेळी पूजा आणि माझ्यामध्ये कधीच बोलणं झालं नाही. तेव्हा मी सिंगल होतो. माझी आजी आणि मावशी मालिका बघून हिच्याबद्दल बोलायचे, सोहम ही बघ.. किती छान मुलगी आहे.".
त्यानंतर पुढे सोहमने सांगितलं, "त्यादरम्यान, मी मध्येच इन्स्टाग्रामवर एक सीरिज सुरु केली होती. म्हणजे कोणत्या भागात काय खायला चांगलं आहे. असंच मी एकदा रामेन बउलचा फोटो शेअर केला होता.त्यावर मला एक मेसेज आला... हे ठिकाण कुठे आहे. मग मी त्यावर रिप्लाय दिला. त्यानंतर मी दुबईला गेलेलो, माझा भाचा तिकडे असतो. तर तो नाचत होता आणि त्याच्यामागे 'हीरामंडी' सुरू होतं. आणि मी इनोसन्सबद्दल पोस्ट केलेली. त्यावर पूजाने मला रिप्लाय केला. आमच्या प्रोडक्शनने पण हिच्याबद्दल आई-बाबांना सांगितलेलं की, ही खूप छान मुलगी आहे. सेटवर वेळेत येते. पाठांतर खूप चांगलं आहे. मग एक बेसिक मॅसेज करणं सुरु झालं, त्यानंतर यादरम्यान हिला पाणीपूरी आवडते याचा अंदाज आला."
आईला पूजाबद्दल सांगितलं, अन्...
त्यानंतर मग एक दिवस मी पूजाला विचारलं, भेटशील का? मी तुला सगळ्यात उत्तम पाणीपुरी खायला घालीन. आयुष्यात अशी पाणीपुरी तू खाल्ली नसशील. मी तिला ठाण्यात प्रशांत कॉर्नरमध्ये पाणी पुरी खायला दिली.त्याच्या बाजूला सतरंज पाणीपुरी आहे, ती खाल्ली. आम्ही जेवढा वेळ घालवला, त्यात मला जाणवलं की, आमच्यात खूप गोष्टी सारख्या आहेत. मी तिला सांगितलेलं, जर मी प्रेमात पडलो तर आता मला लग्नच करायचं आहे. तिचेही तेच विचार होते. मी घरी गेलो, आईला पूजाबद्दल सांगितलं. तेव्हा तिला खूप आनंद झाला.' असा किस्सा सोहमने या मुलाखतीत शेअर केला.
Web Summary : Soham Bandekar and Pooja Birari's love story began with water puris. They first met during a series shoot. Soham impressed Pooja with the delicious water puris. Shared interests and similar thoughts led to marriage.
Web Summary : सोहम बांदेकर और पूजा बिरारी की प्रेम कहानी पानीपुरी से शुरू हुई। वे पहली बार एक सीरियल की शूटिंग के दौरान मिले। सोहम ने स्वादिष्ट पानीपुरी से पूजा को प्रभावित किया। समान रुचियों और विचारों से शादी हुई।