Join us

समाज जागृक करणारा चित्रपट 'सल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:57 IST

महिलांच्या अनेक समस्या आहेत. विविध मार्गाने या समस्या दूर करण्यासाठी सामाजिक लढा देणारे व्यक्तीमहत्व देखील समाजात जागृत असतात. या ...

महिलांच्या अनेक समस्या आहेत. विविध मार्गाने या समस्या दूर करण्यासाठी सामाजिक लढा देणारे व्यक्तीमहत्व देखील समाजात जागृत असतात. या व्यक्तीमहत्वापैकी असाच एक छोटासा  प्रयत्न दिग्दर्शक दुर्गेश गोलीपकर व रविंद्र होनराव यांनी केला आहे. लोकमत सीएनएक्सशी बोलताना दिग्दर्शक रविंद्र होनराव म्हणाले,चित्रपट हे माध्यम मनोरंजनाचे आणि प्रबोधनाचे काम नेहमीच करत असते. समाजात घडणाºया  चांगल्या व वाईट गोष्टींना  मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून होत असतो. त्यामुळे समाजातील चांगल्या व वाईट गोष्टी प्रकाश झोतात येतात. असाच एक प्रामाणिकपणे केलेला हा प्रयत्न म्हणजे सल चित्रपट होय. एका जिद्दीने पेटलेल्या कर्तृत्वान स्त्रीचा जीवन प्रवास सल या चित्रपटात उलगडण्यात आला आहे. ही कहानी मनाला आणि अंतर मनाला स्पर्श करणारी आहे. जीवनात किती ही संकटे आली तरी न डगमगता नव्या उमेदीने कसे जगायचे अशी शिकवण देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात पूनम चव्हाण, मुकेश गायकवाड, विनिता संचेती, उमेश मिटकरी या कलाकारांचा समावेश आहे.तर पूनम व मुकेश हे दोन कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. उत्तम कथानक कलाकारांचा अभिनय या चित्रपटाच्या भक्कम बाजू असून एका महिलेची जिद्दीची कहाणी ही समाज जागृत करण्यास नक्कीच मदत करेल हा विश्वास अहे.