Join us

"इतक्या चुका आणि मूर्खपणा...", बिग बॉस आणि सलमान खानवर भडकली देवोलीना भट्टाचार्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 17:27 IST

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस सीझन १९' (Bigg Boss Season 19) सध्या चर्चेत आहे. दर आठवड्याला शोमध्ये काही ना काही असा गोंधळ होतोच, ज्यामुळे 'विकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांची शाळा घेतो.

वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस सीझन १९' (Bigg Boss Season 19) सध्या चर्चेत आहे. दर आठवड्याला शोमध्ये काही ना काही असा गोंधळ होतोच, ज्यामुळे 'विकेंड का वार'मध्ये होस्ट सलमान खान (Salman Khan) स्पर्धकांची शाळा घेतो. या आठवड्यातही सलमानने अनेक स्पर्धकांना धारेवर धरले, पण यावेळी अभिनेता स्वतःच ट्रोल झाला. दरम्यान बिग बॉसची एक्स स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) हिनेही सलमान आणि बिग बॉसवर नाराजी व्यक्त केली आहे. 

खरेतर, या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक मोठे मुद्दे होते. कुनिका सदानंद यांनी 'सूर-सुरी'वाल्या विधानाचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करणे, अमाल मलिकने अशनूरसाठी 'भुंकणे' हा शब्द वापरणे, अभिषेक बजाजने चिथवणे, नेहलने तान्याच्या मागे लागणे आणि प्रणित मोरेने बसीर अलीची मागून केलेली चेष्टा. मात्र, 'विकेंड का वार'मध्ये अमालच्या विधानाला तोडून-मोडून सांगितल्याबद्दल कुनिका सदानंद आणि त्यांच्यासोबत अभिषेक बजाज यांना फटकारण्यात आले. या प्रकरणात अशनूर कौरलाही ओढण्यात आले. तसेच, तान्याबद्दल वारंवार बोलल्याबद्दल नेहल चुडासमाला सुनावण्यात आले. थोडक्यात सांगायचे झाल्यास, 'विकेंड का वार'मध्ये सलमानने तान्या आणि अमालचे कौतुक केले आणि त्यांना पाठिंबा दिला.

सलमानवर भडकली देवोलीना भट्टाचार्जीआता लोक सलमान खान आणि बिग बॉसवर अमाल मलिकच्या बाजूने पक्षपाती असल्याचा आरोप करत त्याला ट्रोल करत आहेत. इतकंच नव्हे तर, बिग बॉसची एक्स स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिनेही सलमान आणि बिग बॉसचा समाचार घेतला आहे. 'बिग बॉस' नावाच्या एका पेजवर 'विकेंड का वार' मधून अमाल मलिक आणि शहबाज बदेशाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत लिहिले आहे, "परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल सलमान खानला अमालचा अभिमान आहे." या पोस्टला उत्तर देताना देवोलीना भट्टाचार्जीने एक्स हँडलवर लिहिले, "ओह प्लीज. मी फक्त चेंजसाठी 'विकेंड का वार' पाहिला. एकाच वेळी खूप चुका आणि मूर्खपणा."

English
हिंदी सारांश
Web Title : Devoleena Bhattacharjee slams Bigg Boss, Salman Khan for mistakes, stupidity.

Web Summary : Devoleena Bhattacharjee criticizes Salman Khan and Bigg Boss 19 for biased handling of contestants and blatant errors during 'Weekend Ka Vaar', calling it foolish.
टॅग्स :सलमान खानदेवोलिना भट्टाचार्जीबिग बॉस १९