Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून माधुरी दिक्षित आणि रेणुका शहाणे ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’च्या सेटवर दिसल्या एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 13:59 IST

‘झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणार्‍या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या ...

‘झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणार्‍या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने रसिकांचे फुल ऑन मनोरंजन करत आहे.आता स्पर्धेच्या या टप्प्यात रसिकांनी केलेले मतदान आणि श्रोत्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे परीक्षक आणि रसिकांची मने जिंकण्यासाठी टॉप 8 स्पर्धक अटीतटीचा प्रयत्न करीत आहेत. येत्या शनिवारी, 19 मे रोजी रसिकांना एक नेत्रदीपक पर्वणी पाहायला मिळणार आहे.कारण या वीकेण्डच्या भागात या कार्यक्रमाच्या मंचावर  धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे आपल्या ‘बकेट लिस्ट’ या आगामी मराठी  सिनेमाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावणार आहेत.या दोन्ही अभिनेत्रींनी ‘हम आपके है कौन’ या सुपरहिट सिनेमात एकत्र भूमिका साकारल्या होत्या.यावेळी जिया ठाकूरने आपली गुरू वैष्णवी पाटीलच्या मदतीने सादर केलेल्या ‘मेरा पिया घर आया’ या गाण्यावर बहारदार नृत्याने माधुरी दीक्षित आणि सर्व परीक्षकांना भारावून टाकले.जियाचा परफॉर्मन्स पाहिल्यावर दोघेही खूपच भारवल्या होत्या,वैष्णवीला इतक्या लहान वयात नृत्यदिग्दर्शन करताना आणि पाहून मला तिचा खूपच अभिमान वाटला अशा शब्दांत माधुरीने वैष्णवीचे कौतुक केले. विशेष म्हणजे 'डीआडीच्या'सेटवर वैष्णवीला छोटी माधुरी म्हणून ओळखले जाते.माधुरी समोर म्हटल्यावर तिच्यासह डान्स करण्याचा मोह जिया आणि वैष्णवीला आवरता आला नाही.यावेळी माधुरीनेही त्यांची ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करताना ‘ये जवानी है दीवानी’ सिनेमातील‘ घागरा’ या गाण्यावर त्यांच्याबरोबर डान्स करत सा-यांचे मनोरंजन केले.बॉलिवुडच्या दिग्गज कलाकारांनी आपापल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावून मराठी रसिकांचं फुल ऑन मनोरंजन केले आहे.याआधी या मंचावर सलमान खान,शाहरूख खान,सोनम कपूर,कंगणा राणौत यासारख्या अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही रसिकांना पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रेटींना मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले.त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडतायत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.आपल्या सिनेमाच्या प्रमोशन करण्यासाठी माधुरी दिक्षीतलाही 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावणार आहे.आगामी ‘बकेट लिस्ट’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी माधुरी या मंचावर एंट्री करणार आहे.