... म्हणून मी चिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 12:51 IST
ब्रम्हराक्षस - जाग उठा शैतान या मालिकेद्वारे रक्षंदा खानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी नुकतीच रक्षंदा मालिकेच्या ...
... म्हणून मी चिडले
ब्रम्हराक्षस - जाग उठा शैतान या मालिकेद्वारे रक्षंदा खानने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी नुकतीच रक्षंदा मालिकेच्या टीमवर प्रचंड भडकली. रक्षंदा व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून तिला चित्रीकरणासाठी केव्हा बोलावले जाईल याची वाट पाहात होती. पण तिला कल्पना न देता मालिकेच्या टीमने त्या दृश्यासाठी तिच्या बॉडी डबलचा वापर केला. त्यामुळे रक्षंदाने मालिकेच्या सेटवर चांगलाच हंगामा केला. याविषयी ती सांगते, "मालिकेतील एक दृश्य चित्रीत करणे खूप कठीण होते. त्यात एक स्टंटदेखील करायचा होता. माझ्या सुरक्षिततेसाठीच त्या दृश्याचे चित्रीकरण मी न करता माझ्या बॉडी डबलने करावे हा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृश्याचे चित्रीकरण झाल्यानंतर ते मला दाखवण्यात आले. ते पाहिल्यानंतर विशिष्ट ट्रेनिंग घेतलेली व्यक्तीच तो स्टंट करू शकते याची मला कल्पना आली. त्यामुळे मी चिडले हे चुकीचेच होते याची मला जाणीव झाली आहे."