Join us

स्नेहा वाघ आणि शालीन भानोत यांच्यात कोल्डवॉर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 11:58 IST

शेर-ए- पंजाब- महाराजा रणजित सिंग मालिकेत हे दोघेही एका जोडप्याची भूमिका साकरत आहेत. ऑनस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री जितकी चांगली ...

शेर-ए- पंजाब- महाराजा रणजित सिंग मालिकेत हे दोघेही एका जोडप्याची भूमिका साकरत आहेत. ऑनस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री जितकी चांगली दिसते वास्तवात तितकीच खराब आहे. स्नेहा वाघ आणि शालीन भानोत दोघांचे चांगले पटत नाही. दोघांमध्ये सतत काही ना काही कारणामुळे बिनसते. त्यामुळे इतरांनाही नाहक त्यांचा त्रास सहन करावा लागतो. शूटिंगच्या पहिल्या दिवसांपासूनच त्यांचे नीट जमले नाही. त्यांनी एकमेकांचे चांगले मित्र बनण्याचाही कधी प्रयत्न केला नाही. शालीनचे वागणे आवडत नसल्याचे स्नेहाने स्पष्टपणे सांगितलेही आहे.या शोमध्ये स्नेहा वाघ राज कौरची भूमिका करत असून तिने सांगितले की,“मला तो पहिल्याच दिवसापासून आवडला नाही. त्याच्या वादग्रस्त खासगी आयुष्याबद्दल माहिती असल्यामुळे कदाचित माझ्या मनात त्याच्याबद्दल असे घृणा निर्माण झाली आहे. त्याच्याशी बोलण्यासाठी मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जात नाही. आम्ही चांगले मित्र होवू शकत नाही आणि मला त्याच्याशी मैत्री करायची इच्छाही नाही.” मात्र, या शोमध्ये शालीन तिच्या पतीच्या भूमिका म्हणजेच महाराजा सिंगची भूमिका  साकरत असल्यामुळे फक्त भूमिकेसाठीच बोलावे लागत असल्याचे स्नेहाने सांगितले. तर शालीन म्हणाला, “मी सेटवर एका ठराविक लोकांशीच बोलतो, उगाच वायफळ गप्पागोष्टी रंगवण्यात मला इंटरेस्ट नसून  गरजेपलिकडे बोलत नाही आणि तेच नियम स्नेहासाठीही लागू होतात. मला तिच्यासोबत काहीच  प्रोब्लेम नाही. उलट तिच्यासोबत काम करायला आनंद वाटतो. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगली आहे.”त्यामुळे आमच्या दोघांच्या नात्यांमुळे उगाच कामावर फरक पडू द्यायचा नाही असे मी मानतो. शेवटी आपल्याविषयी कोणाला  काय वाटेल या गोष्टीचा मी फारसा विचार करत नसून फक्त कामावर लक्ष देणे हे माझे कर्तव्य असल्याचे समजतो.