Join us

स्नेहा खानविलकर देणार ‘मेरी दुर्गा’ला संगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 17:06 IST

‘खूबसूरत’ आणि ‘गँग्ज आॅफ वास्सेपूर’ यांसारख्या चित्रपटांना दिलेल्या वेगळ्या धाटणीच्या संगीतामुळे लोकप्रिय ठरलेली संगीतकार स्नेहा खानविलकर आता छोट्या पडद्यावरील ...

‘खूबसूरत’ आणि ‘गँग्ज आॅफ वास्सेपूर’ यांसारख्या चित्रपटांना दिलेल्या वेगळ्या धाटणीच्या संगीतामुळे लोकप्रिय ठरलेली संगीतकार स्नेहा खानविलकर आता छोट्या पडद्यावरील मालिकेलाही संगीत देण्यास सज्ज झाली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाºया ‘मेरी दुर्गा’ या मालिकेला स्नेहा संगीत देणार आहे. स्त्रीभ्रूण हत्त्येचे सर्वाधिक प्रमाण असणाºया हरियाणासारख्या राज्यातील एका कुटुंबाची कथा मालिकेत दाखविण्यात आली आहे. सामान्य परिस्थिती असणारा पिता आपल्या मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिच्या शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निश्चय करतो, परंतु त्याची मुलगी खूप प्रयत्न करूनही शिक्षणात कमी पडते आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आगामी मालिकेत मुरब्बी अभिनेता विकी आहुजाने यशपाल चौधरी या पित्याची, तर अनन्या अगरवाल हिने दुर्गाची भूमिका साकारली आहे. मालिकेतील ‘चोरी दो बिलांग की’ या गाण्याला स्नेहाने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आपला स्वरसाज चढविला आहे. ‘लहान मुलाच्या आवाजात एक मजेशीर गाणं धविनमुद्रित करण्याची कल्पना फारच भन्नाट असल्याचे स्नेहाने म्हटले आहे. मनोरंजनाबरोबरच एक संदेशही रसिकांना देणार असा मालिकेच्या टीमचा प्रयत्न असणार आहे.