स्मिताचा लाडका मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:21 IST
स्मिता बन्सल आणि शशांक व्यास यांनी बालिकावधू या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत शशांकने स्मिताच्या मुलाची भूमिका ...
स्मिताचा लाडका मुलगा
स्मिता बन्सल आणि शशांक व्यास यांनी बालिकावधू या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत शशांकने स्मिताच्या मुलाची भूमिका साकारली होती. या आई-मुलाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जाना ना दिल से दूर या मालिकेत काही दिवसांपूर्वी शशांकची एंट्री झाली. आता त्याच्यानंतर स्मिता या मालिकेत झळकणार आहे. याही मालिकेत ती शशांकच्या आईचीच भूमिका साकारणार आहे. रमाकांत म्हणजेच प्रशांत भट्टची दुसरी पत्नी म्हणून तिची मालिकेत एंट्री होणार आहे. विशेष म्हणजे प्रशांत भट्ट आणि स्मिताने अनेक वर्षांपूर्वी इतिहास या मालिकेत काम केले होते. जाना ना दिल से दूर या मालिकेमुळे या दोघांना अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे.