Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मिता तांबे झळकणार बॉलिवुडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:36 IST

बॉलीवुडमध्ये काम करण्याचे प्रत्येक हिरोईनचे स्वप्न असतेच. हिंदीचित्रपटात एखादी छोटी पण दर्जेदार भुमिका जरी साकारायला मिळाली तरीकलाकारांना ...

बॉलीवुडमध्ये काम करण्याचे प्रत्येक हिरोईनचे स्वप्न असतेच. हिंदीचित्रपटात एखादी छोटी पण दर्जेदार भुमिका जरी साकारायला मिळाली तरीकलाकारांना त्यांच्या कारकिर्दिला चार चाँद लागल्यासारखे वाटतात. आपल्या कणखर अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप उमटविलेलीअभिनेत्री स्मिता तांबे हीची स्थिती देखील अशीच काही झाली आहे. स्मिताने परतू, ७२ मैल एक प्रवास, बायोस्कोप, तुकाराम अशा दर्जेदार मराठी चित्रपटांतूनभुमिका साकारल्या आहेत. एवढेच नाही तर तिने अजय देवगनच्या सिंघम २मध्ये देखील अ‍ॅक्टींग केली होती. परंतू आता ती मुख्य भुमिकेतून बॉलीवुडमध्येपदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. अननोन फेसेस या तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटात मनोज वाजपेयी सारख्या सशक्त अभिनेत्याची साथ तिला लाभणारआहे. या चित्रपटाबद्दल बोलताना स्मिता सांगते, मी हिंदी चित्रपटात काम करण्यासखुप उत्सुक होते. हा सिनेमा ससपेन्स थ्रिलर असुन प्रेक्षकांना इमोशनल करणाराआहे. तसेच फॅमिलि व्हॅल्युज जपणारा हा सिनेमा असल्याने मला काम करायलाआवडले.