Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन स्विझर्लंडमध्ये करतेय मजामस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 11:03 IST

भाभीजी घर पर है ही मालिका सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या जीव की प्राण ...

भाभीजी घर पर है ही मालिका सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या जीव की प्राण बनल्या आहेत. ही मालिका शिल्पा शिंदेने सोडल्यानंतर या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटत होते. पण तिने कार्यक्रम सोडल्यानंतर शुभांगी अत्रेने तिची जागा घेतली आणि आज प्रेक्षकांच्या मनावर ती राज्य करत आहे.या मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनने गेल्या महिन्यात गुपचूप तिचा प्रियकर सौरभ देवेंद्र सिंहसोबत लग्न केले होते. सौरभ आणि सौम्या गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहात होते. सौम्या आणि सौरभ हे दोघे कॉलेजपासून एकमेकांचे चांगले फ्रेंड्स होते. त्या दोघांनी धामधुमीत लग्न न करता दोघांच्या कुटुंबीयांच्या आणि फ्रेंड्सच्या उपस्थितीत साधेपणाने गेल्या महिन्यात लग्न केले. सौम्या भाभीजी घर पर है या मालिकच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्या दोघांना फिरायला कुठे जाता आले नव्हते. पण आता चित्रीकरणातून वेळ काढून सौम्या आणि सौरभ स्विझर्लंडला गेले आहेत. सौम्यानेच तिच्या या स्विझर्लंड ट्रीपचे फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. सौम्या स्विझर्लंडला गेल्यावर मजामस्ती करण्यासोबतच नवीन काही गोष्टी शिकवण्याचादेखील प्रयत्न करत आहे. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोत ती चॉकलेट बनवण्याच्या क्लासेसना गेली असल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या फोटोत स्केटिंग शिकण्याच्या क्लासेसमध्ये जायची तयारी करत असताना ती पाहायला मिळत आहे. सौम्या तिच्या या हॉलिडेचा पुरेपूर वापर करत असल्याचे आपल्याला या फोटोंमधून दिसून येत आहे.