Join us
Daily Top 2Weekly Top 5

गायिका प्रियांका बर्वे पहिल्यांदाच दिसणार 'या' भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 13:07 IST

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत 'सम्राटपर्व२' ...

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा संगीत 'सम्राटपर्व२' प्रेक्षकांच्या भेटीस घेऊ नयेत आहे. संगीत सम्राट पर्व दुसरेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे पर्व अधिक रंजक बनवण्यासाठी या कार्यक्रमाच्या रुपरेषेत काही बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे हे नवे पर्व एका वेगळ्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या पर्वामधील प्रमुख बदल म्हणजे यावेळी स्पर्धक हे काही टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स अभिजीत कोसंबी, सावनी रवींद्र, राहुल सक्सेना आणि जुईली जोगळेकर हे हरहुन्नरी गायक असणार आहे. हे कॅप्टन्स स्पर्धकांचे मार्गदर्शकच असणार आहेत आणि ते त्यांना स्पर्धेसाठी तयार होण्यास मदत करणार आहेत.तसेच लोकसंगीत गायक आदर्श शिंदे आणि शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे स्पर्धकांना पार करण्यासाठी परीक्षकाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहेत. कोणत्याही रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन हा महत्वाचा घटक असतो आणि संगीत 'सम्राटपर्व२'ची सूत्रसंचालक दुसरी तिसरी कोणी नसून गायिका प्रियांका बर्वे आहे. मराठी क्षेत्रातील गायिका आणि अभिनेत्री असलेली प्रियांका ती साकारत असलेल्या प्रत्येक भूमिका समरसतेने सादर करण्यासाठी लोकप्रिय आहे. संगीताचा वारसा लाभलेली प्रियांका नामवंत गायक पद्माकर बर्वे आणि मालती पांडे-बर्वेयांची नात आहे.त्यामुळे संगीताचे बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळाले आहे.एकगायिका तसेच फिरोझखान यांच्या मुघल-ए- आझम या नाट्यकृतीत सादर केलेल्या अनारकलीमुळे उत्तम अभिनेत्री म्हणून देखील नावारूपास आली.प्रियांका तिच्या खेळकर स्वभावामुळे प्रेक्षकांची आवडती आहे. अनेक मराठी मालिकांसाठी तिने शिर्षक गीतेगायली आहेत. तिच्यामधुर आवाजाने तिने अनेकांवर भुरळपडली आहे. गायिका आणि अभिनेत्रीनंतर आता प्रियांका सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. एक अभिनेत्रीआणि गायिका म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर आम्हाला खात्री आहे की प्रियांका सूत्रसंचालक म्हणून सुध्दा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल. संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये उत्तम गाऊ शकणारा सूत्रसंचालक मिळणे यापलीकडे चांगली गोष्ट काय असू शकते.