Join us

'सिंबा' फेम अभिनेत्री उल्का गुप्ताचं ४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 17:22 IST

Ulka Gupta: रणवीर सिंगच्या 'सिंबा' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री उल्का गुप्ता तब्बल ४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे.

रणवीर सिंगच्या 'सिंबा' (Simba) चित्रपटात झळकलेली अभिनेत्री उल्का गुप्ता (Ulka Gupta) तब्बल ४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे. यापूर्वी तिने छोट्या पडद्यावर राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती स्टार प्लस वाहिनीवरील 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

स्टार प्लस वाहिनीवर लवकरच 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी' ही नवीन मालिका दाखल होत आहे. ही मालिका बन्नीच्या प्रवासाविषयी आहे, एक खंबीर आणि धाडसी मुलगी जी अन्न वितरणाचा व्यवसाय चालवते जिथे लोक स्थिर पगाराच्या शोधात शहरात गेलेत, आणि त्यांना घरच्या जेवणाची खूप आठवण येते. त्यांना बन्नी घरी शिजवलेले अन्न देते. 

उल्का तब्बल चार वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन करत आहे. तिने तिच्या मागील मालिकेत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली होती आणि 'बन्नी' म्हणून तिची नवीन भूमिका तितकीच मनोरंजक असेल यात शंका नाही. तिच्या पुनरागमनामुळे अनेकांना आनंद झाला आहे आणि ते तिला 'बन्नी ची भूमिका निभावताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

याबद्दल अभिनेत्री उल्का गुप्ता म्हणाली, "ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया होती ज्यातून मी गेली. बॉलिवूड आणि साऊथमध्ये काही चित्रपट केले. त्यानंतर, स्टार प्लसवरील 'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी' मालिकेची ऑफर झाली. ही माझ्यासाठी योग्य संधींपैकी एक होती आणि त्यानंतर मी छोट्या पडद्यावर परतण्याचा निर्णय घेतला. माझा आलेख आणि अनुभव लक्षात घेऊन, बन्नी ही एक अशी आव्हानात्मक भूमिका आहे जी मला माझ्या चाहत्यांसाठी साकारायची आहे." उल्कासोबत या मालिकेत अभिनेता प्रवेश मिश्रा दिसणार आहे. तो युवानची भूमिका साकारणार आहे.'बन्नी चाऊ होम डिलिव्हरी' ही मालिका ३० मे २०२२ ला दर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळेल.

टॅग्स :सिम्बा