Join us

सिद्धार्थ शुक्लाच्या कारची मागची काच कशी फुटली? काल रात्री नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 14:25 IST

Sidharth Shukla Death : सिद्धार्थने काल रात्री झोपण्याआधी काही औषधं घेतली होती. पण सकाळी तो उठलाच नाही. अशात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय.

ठळक मुद्देदरम्यान पोलिसा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारची शंका वा संशय व्यक्त केलेला नाही.

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर (Sidharth Shukla Death) सर्वांनाच धक्का बसला असून टीव्ही व बॉलिवूड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांना अद्यापही सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीवर विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा खुलासा केलेला नाही.प्राप्त माहितीनुसार, सिद्धार्थने काल रात्री झोपण्याआधी काही औषधं घेतली होती. पण सकाळी तो उठलाच नाही. अशात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येतेय.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सिद्धार्थ काल रात्री घराबाहेर गेला होता. रात्री उशीरा तो आपल्या बीएमडब्ल्यू कारने घरी पोहोचला होता. मात्र या कारची मागची काच फुटलेली आढळून आली आहे. कारची अवस्था बघता, गेल्या रात्री सिद्धार्थचे कोणाशी भांडण वा वाद तर झाला नव्हता ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सिद्धार्थच्या कारची काच कशी फुटली, हे अद्याप कळू शकलेले नाही. सिद्धार्थचा कुणाशी वाद झाला होता का? यामुळे तो डिस्टर्ब होता का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

दरम्यान पोलिसा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारची शंका वा संशय व्यक्त केलेला नाही. डॉक्टरांनी सिद्धार्थला ‘डेथ बिफारे अराइव्हल’ घोषित केले होते. म्हणजेच रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सिद्धार्थचा मृत्यू झाला होता. अद्याप सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्ला