Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सिद्धीविनायक' मालिकेमध्‍ये येणार 'हा' नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 06:30 IST

सिद्धीविनायक मालिकेत एका मॉडर्न सून नक्‍की आहे. यामध्‍ये सध्‍याच्‍या ट्रॅकमध्‍ये दाखवण्‍यात येत आहे की, रुद्रपासून सुटका करुन घेण्‍याकरिता मंजरी (उत्‍कर्षा नाईक) आणि सिद्धी (फरनाझ शेट्टी), उर्वशी (रोशनी रस्‍तोगी)ला घेऊन येतात.

ठळक मुद्देजेव्‍हा उर्वशीची नजर विनवर खिळते आणि त्‍याबरोबरच खरा ड्रामा सुरु होतो

सिद्धीविनायक मालिकेत एका मॉडर्न सून नक्‍की आहे. यामध्‍ये सध्‍याच्‍या ट्रॅकमध्‍ये दाखवण्‍यात येत आहे की, रुद्रपासून सुटका करुन घेण्‍याकरिता मंजरी (उत्‍कर्षा नाईक) आणि सिद्धी (फरनाझ शेट्टी), उर्वशी (रोशनी रस्‍तोगी)ला घेऊन येतात. पण, त्‍यांचा हा डाव तेव्‍हा पूर्णपणे पलटतो, जेव्‍हा उर्वशीची नजर विन (नितीन गोस्‍वामी)वर खिळते आणि त्‍याबरोबरच खरा ड्रामा सुरु होतो. ब-याच दुष्‍ट खेळी खेळल्‍यानंतर आणि सिद्धीवर चुकीचे आरोप लावल्‍यानंतर, शेवटी ती विनचा विश्‍वास जिंकते आणि त्‍याच्‍यासोबत लग्‍न करते. घटनाक्रमांमध्‍ये बरीच वळणे येत असून याच्‍या सध्‍या सुरु असलेल्‍या ट्रॅकमध्‍ये सिद्धी बदललेल्‍या अवतारात दिसली आहे. ती कमजोर मुलीचे रुप सोडून एका सशक्‍त नारीच्‍या रुपात दिसून येते, जी आपल्‍या पतीला अशा मार्ग व स्थितींतून परत मिळवण्‍यासाठी सर्व विषम परिस्थितींना सामोरी जाते, ज्‍या उर्वशी त्‍यांच्‍या आयुष्‍यात आणते. या शोमध्‍ये जो नवीन ड्रामा समोर येणार आहे, तो भरपूर हास्‍यपूर्ण असणार आहे आणि खात्रीने दर्शकांना खळखळून हसवणार आहे. सिद्धी उर्वशीकडून आपला सूड घेते आणि स्‍वत:ला हुशारीने पण मजेशीररित्‍या योग्‍य सिद्ध करते. विनायकच्‍या जवळ जाण्‍याच्‍या उर्वशीच्‍या प्रत्‍येक कारस्‍थानाला सिद्धी योग्‍य उत्‍तर देते. जेव्‍हा उर्वशी आणि विन खोलीत एकटे असतात, तेव्‍हा तर ती गिफ्टमध्‍ये लपेटून बॉम्‍ब देण्‍याकरिता किन्‍नरांसोबत खोलीत येते. यामुळे उर्वशी आणि विनचा चेहरा काळा होऊन जातो. सिद्धी कोणतीही कसर सोडत नाही आहे. ती पहिली पत्‍नी, बीवी नंबर १ असण्‍याचे सर्व डाव खेळत आहे, कारण कायदेशीररित्‍या विन आणि तिचा घटस्‍फोट झालेला नाही.

या शोमध्‍ये पुढे येणा-या कॉमेडी ड्रामाविषयी बोलताना फरनाझ म्‍हणाली, ''याच्‍या पुढील एपिसोडमध्‍ये सिद्धीचे सशक्‍त रुप दिसेल, जिच्‍यासोबत आतापर्यंत दर्शकांची बिचारी म्‍हणून सहानुभूती होती. जस- जशी कथा पुढे सरकेल, यामध्‍ये कॉमिक ट्विस्‍ट देखील पाहायला मिळतील, ज्‍याचा या शोमध्‍ये आम्‍ही आतापर्यंत प्रयोग केला नव्‍हता. मला खात्री आहे की, दर्शकांना सिद्धीचे हे नवीन रुप नक्‍कीच आवडेल आणि मी त्‍यांची प्रतिक्रिया पाहण्‍यास अत्‍यंत उत्‍सुक आहे.''

टॅग्स :सिद्धीविनायक