सिद्धी छोट्या पडद्यावर परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 18:01 IST
सिद्धी कारखानीसने देवयानी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ही मालिका ...
सिद्धी छोट्या पडद्यावर परतणार
सिद्धी कारखानीसने देवयानी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षक त्यांच्या लाडक्य सिद्धीला मिस करत आहेत. पण सिद्धीने नुकतीच एक मालिका साईन केली असून ती छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. सिद्धी काहीच दिवसांत एका नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे कळतेय.