Join us

सिद्धार्थ महादेवनने गायले नागार्जुनचे थिम साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 17:48 IST

गायक शंकर महादेवनचा मुलगा सिद्धार्थ महादेवनने आतापर्यंत अनेक चित्रपटांत गायन केले आहे. त्याच्या आवाजाचे कौतुकही केले जात आहे. भाग ...

गायक शंकर महादेवनचा मुलगा सिद्धार्थ महादेवनने आतापर्यंत अनेक चित्रपटांत गायन केले आहे. त्याच्या आवाजाचे कौतुकही केले जात आहे. भाग मिल्खा भाग या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. आता सिद्धार्थ पहिल्यांदाच एका मालिकेसाठी गायला आहे. नागार्जुन-एक योद्धा या मालिकेचे थीम साँग त्याने गायले आहे. नागार्जुन-एक योद्धा या मालिकेत प्रेक्षकांना अर्जुन या तरुणाची कथा पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे गाणे हे अर्जुनच्या आयुष्याशी संबंधित असल्याने सिद्धार्थसारख्या तरुण गायकाची निवड हे थिम साँग गाण्यासाठी करण्यात आली आहे. या गाण्याचे बोल अतिशय आवडल्याचे सिद्धार्थ सांगतो.